पोलिसांच्या तपासात धक्कादायक गंभीर बाब उघड…!!
अमीन शाह
नागपूर , दि. १८ :- लहान मुल रडायला लागलं की अनेकदा त्याला खेळण्यासाठी म्हणून मोबाइल दिला जातो. मात्र याच मोबाइलचे व्यसन भविष्यात जीवघेणे ठरू शकते. नागपूरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइलच्या नियमित वापरामुळे एका 14 वर्षीय मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून पोलिस तपास करीत आहे .
या मुलाचे नाव वंश राजू इमला असे असून तो आठवीत शिकत होता. त्याची आई एका खासगी कंपनीत काम करते. वंश हा त्याच्या आई व आजीसोबत गजानन परिसरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. कोणत्याही गोष्टीत त्याचे लक्ष लागत नव्हते. तो नियमितपणे शाळेतही जात नव्हता. तो व्यवस्थित जेवत नव्हता की झोपत नव्हता. सतत मोबाइलवर काहीतरी करीत असे. त्याला मोबाइलचं व्यसन असल्याची माहिती समोर येत आहे. काल शुक्रवारी वंशच्या आईने चिडून त्याच्या हातून मोबाइल काढून घेतला.
यामुळे वंश खूप अस्वस्थ झाला व आईवर प्रचंड चिडला. काही वेळाने त्याची आई नोकरीसाठी घराबाहेर पडली. घरात आजी व वंश हे दोघेच होते. याचा फायदा घेत त्याने गळफास लावून आत्महत्या केली. वंशच्या अचानक जाण्याने त्याच्या आईला जबरदस्त धक्का बसला आहे. याबाबत पोलिसांनी तपास केल्यास धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या मोबाईल हिस्ट्रीतून वंशला पॉर्न बघण्याची सवय होती. अनेकदा घरातल्यांपासून लपून तो मोबाइलमध्ये पॉर्न बघत बसायचा. मुलांना मोबाइल दिल्यानंतर तो काय बघतोय याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. मुलगा खेळ खेळतोय असे म्हटल्यावर तो खरंच गेम खेळतोय का हे आपण नियमित तपासायला हवे. अन्यथा त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. हे आज घडलेल्या घटने वरून लक्षात आले आहे .