महत्वाची बातमी

वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या टॅक्सीला अपघात दोन ठार , “दोन गंभीर”

Advertisements

मृतात खामगाव येथील एकाचा समावेश

अमीन शाह

मूर्तिजापूर / अकोला , दि. १८ :- नागपूर येथून अकोला जिल्ह्यात वृत्त पत्र पार्सल घेऊन येणारी टॅक्सी गाडीला आज मूर्तिजापूर जवळ अपघात झाला असून झालेल्या या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार वृत्तपत्र घेऊन येणारी टॅक्सी पहाटे चार वाजताच्या दरम्यान उभा असलेल्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरवर आदळल्याने टॅक्सीतून प्रवास करणारे दोन जण ठार झाले तर टॅक्सीतील दोन जण आणि ट्रॅक्टर ने धडक दिल्याने एक जण असे तीन गंभीर जखमी झाले. घटना १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ घडली मृतांमध्ये एका तृतीय पंथीचा समावेश आहे.मृतांमध्ये खामगाव येथील मोहम्मद सादिक अब्दुल समद वय 47 वर्ष यांचा समावेश तर प्रेरणा नामक किन्नर ही झालेल्या अपघातात ठार झाल्याचे समजले त्याचप्रमाणे इरफाना नामक किन्नर जबर जखमी असून अनुला सर नामक एक शिक्षक गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोला येथे उपचारा साठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...