Home मराठवाडा माहेरची साडी व सुकन्या समृध्दी खाते लेकीसाठी आपुलकीचं – डाक अधीक्षक नांदेड

माहेरची साडी व सुकन्या समृध्दी खाते लेकीसाठी आपुलकीचं – डाक अधीक्षक नांदेड

165

पोलीसवाला ऑनलाइन मिडियानांदेड , दि.१८ :- रोजी रिसनगाव लोहा येथे मा. डाक अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजना जनतेच्या दारी मेळावा साहयक डाक अधीक्षक श्री.संजय आंबेकर व मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार यांनी आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याच्या अध्यक्षतेखाली बोलताना डाक अधीक्षक गावातील नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की डाक विभागाच्या योजना सर्व जनतेच्या विकासासाठी आहेत महत्वाची योजना म्हणजे जसे लेकीसाठी माहेरची साडीचं कौतुक असते त्याचं प्रमाणे सुकन्या समृध्दी खाते पुस्तकांचे कौतुक मुलगी एकवीस वर्षा झाल्याने वाटते.कारक या मध्ये आई वडिलांची माया असते.या सुकन्या समृध्दी खाते योजना खात्यामुळे मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुलीला मोठी मदत होते. असे डाक आधीक्षकांनी आपल्या भाषणात बोलत होते. या कार्यक्रमाला गावातील सरपंच श्री. अजय नाईक ,उप सरपंच श्री.माधव तिगोटे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बाळाजी पवार हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डाक अधीक्षक म्हणाले की ग्रामीण भागातील मुलीला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी डाक विभाग मिशन बालिका शक्ती अंतर्गत डाक विभागाच्या योजना जनतेच्या दारी हा कार्यक्रम संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यांचा लाभ गावातील नागरिकांनी घ्यावा असे आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहयक डाक अधीक्षक श्री.संजय आंबेकर यांनी मार्गदर्शन करताना पोस्ट ऑफिस हे पत्र वाटपाचे एवढेच काम नाहीं तर याचे रूपांतर डिजिटल व स्मार्ट पोस्ट ऑफिस झाले आहे.
पोस्ट ऑफिस मध्ये बँकींग सुविधा व विविध शासकीय अनुदान पोस्ट खात्यात आल्या आहेत.या सर्व योजना चा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिक लाभ घेत आहेत असे संजय आंबेकर यांनी सांगितले.मार्केटिंग एक्सिकेटीव्ह श्री.सुरेश सिंगेवार यांनी बोलताना म्हणाले नांदेड जिल्ह्यातील महिला सरपंच सो. वनमाला तोडसाम यांनी साडीचे पैसे बचत करून डाक विभाग योजनेचे मकरसंक्रांतरीचे वाण म्हणून सुकन्या समृध्दी पुस्तकाचे वाण महिलांना दिले हे भारतातील सर्व डाक कर्मचाऱ्यांनसाठी व डाक विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे त्यांनी आपल्या भाषणात नागरिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास नांदेड टीम व कर्मचारी श्री.डाक आवेक्षक श्री.पवार व नागरिक व महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.