Home महत्वाची बातमी ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या गाडीला भीषण अपघात

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या गाडीला भीषण अपघात

120
0

रुग्णालयात उपचार सुरू

अमीन शाह

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात शबाना आजमी यांना दुखापत झाली असून त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात शबाना आजमी सुरक्षीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही.

शबाना आजमी या आपल्या खासगी कारमधून मुंबई येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. सुट्टी साजरी करण्यासाठी त्या खंडाळा येथे निघाल्या होत्या. अपघातात त्यांच्या नाकाला आणि तोंडाला दुखापत झाल्याची माहिती आहे. खालापूर टोलनाक्याजवळ आल्यावर त्यांच्या कारने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिणीने दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, शबाना आजमी यांच्यासोबत कारचालक आणि आणखी एक व्यक्ती असे मिळून तीघेजन कारने प्रवास करत होते. आजमी यांच्या कारचा चालक ही जखमी झाला आहे.

Previous articleमाहेरची साडी व सुकन्या समृध्दी खाते लेकीसाठी आपुलकीचं – डाक अधीक्षक नांदेड
Next articleसंविधान बचाव कृती समिती तर्फे मुक्ताईनगर येथे धरने आंदोलन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here