
दोघांचा मृत्यू ,
अमीन शाह
बुलढाणा
तरिश्रन चौकात रस्त्याच्या कडेला पोटाची खळगी भरण्यासाठी चिखली येथून शहेरात आलेल्या घिसडी समाजाचा एक कुटुंब रस्त्याच्या कडेला पाल टाकून राहत होता त्याच ठिकाणी हे कुटुंब , कु – हाडी , पास , खुरपे आदी शेतीउपयोगी साहित्य बनवून आपली उपजीविका भागविता होते हे सर्व कुटुंब जेवण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या पालात झोपी गेले होते की काल रात्री 12 ते 1 च्या दरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि भरधाव वेगाने येणाऱ्या अॅम्बुलन्स चे टायर फुटले व अॅम्बुलन्स पालात घुसली व काही कळायच्या आतच गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबा वर चढली यात अनिल गंगाराम पडोळकर वय वर्षे 29 याचा जागीच मृत्यू झाला तर यातील जखमी सौ बेबाबाई शेषराव सोळंके वय वर्ष 35 , आकाश अनिल पडोळकर वय वर्ष 4 , शेषराव लक्ष्मण सोळंके वय वर्ष 40 मायाबाई अनिल पडळकर वय वर्ष 30 हे सर्व राहणार पारधीबाबा मंदिराजवळ चिखली हे सर्व गंभीर रित्या जखमी झाले यातील मायाबाई अनिल पडळकर वय वर्षे 30 या गंभीररित्या जखमी झाल्याने यांना अकोला येथे रात्रीच रेफर करण्यात आले होते परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरु , हेडकॉन्स्टेबल प्रशांत शास्त्री , माधव पेटकर , गंगेश्वर पिंपळे ,अमोल खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचविले अपघातास कारणीभूत ठरणारी ही अंबुलन्स कोलवड येथील योगेश पुंजाजी जाधव यांची असल्याचे निष्पन्न झाले तात्काल पोलिसांनी MH 28-7136 शहर पोलिस ठाण्यात अ.प क्रमांक 173/2021 कलम 279 337338 427 304 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अपघातास कारणीभूत ठरणारी ही अंबुलन्स जप्त केली आहे , अद्याप चालकास अटक करण्यात आली नसून पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहे , घडलेल्या अपघाता मुळे दुःख वयकत केले जात आहे ,











































