Home महत्वाची बातमी अवैध गुटख्या विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही एक लाख 96 हजारांचा माल...

अवैध गुटख्या विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही एक लाख 96 हजारांचा माल जप्त ,

269

 

जिल्ह्यातील पाच व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल ,

 

अमीन शाह

बुलडाणा ,

गुन्हे शाखा बुलडाणा येथील पथकाकडून प्रतिबंधीत अन्न पदार्थ गुटख्याविरूध्द विशेष मोहीम राबविण्यात आली असून 1 लाख 96 हजार 796 रू चा मुदेमाल व 5 आरोपि विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे बुलडाणा जिल्हयातील अवैध प्रतिबंधित गुटख्याविरुध्द विशेष मोहिम राबवून जास्तीत जासत कार्यवाहया करण्याचे श्री अरविंद चावरिया . पोलीस अधीक्षक , बुलडाणा यांनी गुन्हे शाखेचे प्रमुख श्री बळीराम गिते , पोलीस निरीक्षक , बुलडाणा यांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने श्री बळीराम गिते यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथे पथके नेमले होती .या अंतर्गत दिनांक 15.03.2021 व दि 16.03 2021 रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार त्या ठिकाणी जावून कार्यवाही करण्यात आली असता त्या मध्ये आरोपी गणेश सुभाष अक्कर , वय 37 वर्ष , रा जानेफळ ता मेहकर जि बुलडाणा • पोलीस ठाणे : अमडापूर • घटनास्थळ : अमडापूर ते जानेफळ रोड • कार्यवाही दिनांक : 15.03.2021 • जप्त मुदेमाल : 1 , प्रतिबंधीत गुटख्याचे 60 पॉकेट कि अं 9700 / – रू . 2. मोटार सायकल कि अं 55,000 / – रू असा एकूण 64,700 / – रू चा मुदेमाल * कार्यवाही क 2 • आरोपी नाव : प्रविण अशोक रणित . वय 33 वर्ष , रा शिवाजीनगर , मलकापूर जि बुलडाणा • पोलीस ठाणे : मलकापूर शहर घटनास्थळ : आठवडीबाजार • कार्यवाही दिनांक : 15.03.2021 • जप्त मुदेमाल : 1. प्रतिबंधीत गुटखा कि अं 40,588 / -रू कार्यवाही क 3 . • आरोपी नाव : मनोज रामस्वरूप बोहरा , वय 48 वर्ष , रा शनिवार पेठ , देउळगांव राजा पोलीस ठाणे : देउळगांव राजा • घटनास्थळ : बसस्थानक चौक देउळगांव राजा रोड कार्यवाही दिनांक : 15.03 2021 • जप्त मुदेमाल : 1. प्रतिबंधीत गुटखा किं अं 2520 / -रू . कार्यवाही के 4 • आरोपी नाव : पंकज हिरालाल सतवाणी , वय 33 वर्ष , रा आमृतबाग तलाय , खामगांव .पोलीस ठाणे : खामगांव शहर . घटनास्थळ : आठवडी बाजार खामगांव • कार्यवाही दिनांक : 18.03.2021 • जप्त मुदेमाल : 1 प्रतिबंधीत गुटखा कि अं 61,786 / – रू कार्यवाही क 5 • आरोपी नाव : अनिल अमरचंद पवार , वय 29 वर्ष , रा मौची गल्ली , खामगाव • पोलीस ठाणे : खामगांव शहर यांच्यावर कार्यवाही करण्यात येऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

कामगिरी श्री अरविंद चावरिया , पोलीस अधीक्षक , बुलडाणा , श्री हेमराजसिंग राजपूत , अपर पोलीस अधीक्षक , खामगांव , श्री बजरंग बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक , बुलडाणा व श्री बळीराम गिते . पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा . बुलडाणा यांचे मार्गदर्शनात श्री निलेश शेळके . पो उप नि . श्री प्रदीप आढाव , पोउपनि , पोलीस अंमलदार शेषराव आंभोरे , शे साजीद , सयद हारूण , अत्ताउल्लाखॉन , चांदूरकर , गिता बामदे , सुनिल खरात , दिपक पवार , गजानन आहेर , पंकज मेहर , सुभाष वाघमारे सुरेश भिसे , निलेश वाकडे यांनी पार पाडली आहे .