Home बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यातील अज्ञाताने पत्रकाराची मोटारसायकल पेटवून दिल्याने ८० हजाराचे झाले नुकसान

बुलडाणा जिल्ह्यातील अज्ञाताने पत्रकाराची मोटारसायकल पेटवून दिल्याने ८० हजाराचे झाले नुकसान

617

सोशल मीडियावर व्यक्त केल्यात जात आहे रोष

प्रा.मो.शोएबोद्दीन

जिल्ह्यातील डोणगांव येथील पत्रकार देविदास खनपटे यांच्या मालकीची यामाहा फेजर मोटारसायकल अज्ञाताने ११ मार्चच्या रात्री १ वाजता दरम्यान पेटवून दिली ज्याने ८० हजाराचे आर्थिक नुकसान झाले.
पत्रकार आपल्या लेखणीतून नेहमीच अनेक विषयांवर लिहीत असतात अश्यातच कित्येकांच्या वर्मी घाव बसून त्यांच्या अवैध कामावर निर्बंध येतात त्यातून पत्रकारावर हल्ले त्यांचे आर्थिक नुकसान असे प्रकार घडत असतात अश्यातच डोणगांव येथील आपला विदर्भ लाईव्ह चे संपादक देविदास खनपटे यांच्या मालकीची मोटारसायकल यामाहा फेजर ही मोटार सायकल बस स्टँड समोर राहत्या घरा समोरील जागेत उभी होती तेव्हा अज्ञाताने ११ मार्चच्या रात्री १ वाजता दरम्यान गाडीला आग लागली यात यामाहा फेजर मोटारसायकल अंदाजे किंमत ८० हजार रुपयांचे नुकसान झाले याची माहिती डोणगांव पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी ४३५ नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला तपास विष्णू जायभाये करीत आहेत.
पत्रकाराची गाडी अज्ञाताने पेटवून दिल्याची माहिती विविध सोशल मीडिया माध्यमावर व व्हाट्सएपच्या ग्रुपवर मिळताच प्रतिक्रिया उमटल्या पत्रकारांची मुस्काटदाबी करणाऱ्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कार्यवाही व्हायलाच हवी कारण अश्या प्रकारे नुकसान करून पत्रकारांस धमकवण्याचा सुद्धा एक केविलवाणा प्रकार असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.