Home बुलडाणा दिराने भावजाईवर कोयत्याने केला जीवघेणा हल्ला ,

दिराने भावजाईवर कोयत्याने केला जीवघेणा हल्ला ,

314

https://youtu.be/mA4s9KL0ilU

पुतणी चा कान कापला ,

 

अमीन शाह ,

बुलडाणा

घरगुती वादातून दिराने आपल्या भावजइ आणि तिच्या दोन मुलींवर कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सवणा येथे घडलीय.. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशन मध्ये जखमी महिलेच्या दिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

चिखली तालुक्यातील सवणा येथील श्रीमती शारदा वसंता हावरे यांनी काल ७ मार्च रोजी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.. शारदा हावरे ह्या त्याच्या दोन मुलींसोबत राहते, आणि शेतात शेत मजुरी करते… सन २०१५ मध्ये त्यांचा पती वसंता हावरे यांचा मृत्यू झालाय.. तेव्हापासून माझा आरोपी असलेला त्यांचा दिर प्रभाकर हावरे हा त्यांच्या सोबत आणि दोन मुलींसोबत लहानसहान कारणांवरून भांडण झगडा करीत असतो आणि विनाकारण त्रास देतो… ६ मार्च २०२१ रोजी रात्रीला घरा शेजारी राहनाऱ्या महिलेसोबत बोलत असतांना आरोपी प्रभाकर हावरे याने काही एक कारण नसतांना हातात कोयता घेऊन आला आणि मुलीच्या अंगावर हाथ उचलला, यामध्ये मुलीच्या डाव्या कान कोयत्याच्या पात्याने कापल्या गेला, तिचे रक्त निघत असतांना तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतांना शारदा यांच्या हाताला मार लागून जखमी झाल्या.. यावेळी दुसरी मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्याने तिच्या सुद्धा कानावर कोयता मारून जखमी केलेय , तसेच तिघा मायलेकींना हाताने मारहाण केलीय.. या अगोदर सुद्धा त्यांनी शेतीच्या वाटणी हिस्स्याचे सह शेती पेरण्याच्या कारणावरून अशाच प्रकारची मारहाण केली होती, परंतु त्यावेळी गावातील लोकांनी भांडण आपसात मिटवल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नव्हता… शारदा यांच्या कुटुंबात कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने त्याचा फायदा घेऊन नेहमी लहानसहान कारणांवरून तसेच काही कारण नसतांना मारहाण करून भांडणे करीत असतो, शिवीगाळ करतो, जीवे मारून टाकीन, तुमचा खून करेन अशा धमक्या सुद्धा देत असल्याची तक्रार विधवा महिला शारदा हावरे यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये दिलीय.. एक मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून
जखमी महिलेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपी दिर प्रभाकर नामदेव हावरे, यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला