Home बुलडाणा समाज बांधवांनी हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र येऊन काम करण्याची गरज …..: जिल्हाध्यक्ष...

समाज बांधवांनी हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र येऊन काम करण्याची गरज …..: जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे

409

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेची जिल्हा स्तरीय बैठक सम्पन्न
चिखली : प्रतिनिधी
पारंपारिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाºया तेली समाज हा देशासह राज्यात मोठा वर्ग असून ही अनेक योजनांन पासून वंचित आहे. कारण समाजात एकजुट नसल्याने परंतु आज समाजासाी काही तरी करण्याची वेळ आली आली आहे. करीता समाज बांधवांनी हेवेदावे बाजूला सारून समाजासाठी एकत्र यावे . त्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंंत पाखरे यांनी चिखली येथील जिल्हा स्तरीय बैठकीत केले.
नुकतेच वर्धा येथे झालेल्या सभे अन्वये मा.प्रदेशाध्यक्ष रामदास तडस, ना.विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, अशोककाका व्यवहारे, गजानन नाना शेलार,डॉ.भूषण कर्डिले व आ.संदिपभैयाजी क्षीरसागर यांचे संयुक्त सुचने नुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा स्तरीय बैठकीचे आयोजन दि.७ फेब्रूवारी रविवारी रोजी स्थानिक सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश देवडे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून दादा जम्मन व्यवाहारे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे उपस्थित होते. या बैठकीत नागपूर येथे महारॅलीचे आयोजन व रॅलीत येणारे समाज बांधवची संख्या, ओबीसी वगार्ला न्याय मिळवून देण्याकरिता होणाºया मेळाव्याच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील विविध आोबीसी समाजांच्या नेतृत्वांना संघटित करणे, जिल्ह्यातील, तालुक्यातील जनगणनेची माहिती, जिल्हा आणि तालुक्यातील नियुकत्या करण्यात आल्या. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत म्हणाल्या की, तेली समाजाचे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणी प्रमाणे तेली समाजाच्या प्रत्येक माणसांने त्यांच्या विचारांचा वारसा घ्यावा .तर आपल्या मुलामुलींना शिक्षणाचा प्रवाहात आणणे .व अतीअल्प दरात वसतीगृहाची व्यवस्था समाजाने करावी त्याचप्रमाणे डॉ क्षिरसागर जानेफळ अध्यक्ष ,रामदास देवडे मा.नगरसेवक गोपाल देवडे ,नगर सेवक राजेश केदारे ,.महाराष्ट्र प्रांतीक तैलीक संघटना सोबत काम करीत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी विविध समाजपयोगी कार्य करीत असतांना आता महिलांनी पुढे येऊन हातभर लावावे असे सांगितले मार्गदर्शन नात मत व्यक्त केले . तसेच नाशिक येथे हेणाºया सभे साठी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर नवनिर्वाचित चिखली तालुका अध्यक्ष पदी सौ दिपाली सुरडकर ,सौ भारती लोखंडे उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली युवक व जेष्ठ पदाधिकारी यांच्या सी नियुक्ती करण्यात आल्या . य कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष रायमूल यांनी केले तर उपस्थितांचे आभार दत्ता करवंदे यांनी मानले. याप्रसंगी जिल्हयातील तसेच तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य तसेच समाज बांधव महिला व पुरुष बहूसंख्येत उपस्थित होते.