Home नांदेड मुदखेडच्या नगराध्यक्षांसह दोन जणांविरुद्ध ॲट्रासिटी गुन्हा दाखल ‌.

मुदखेडच्या नगराध्यक्षांसह दोन जणांविरुद्ध ॲट्रासिटी गुन्हा दाखल ‌.

62
0

मजहर शेख

नांदेड/मुदखेड,दि:११:- तु पालिकेत , का ,आलास ? म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुदखेडच्या नगराध्यक्षासह दोघांविरुद्ध ॲट्रसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत बजरंग वामनराव खोडके यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ते पालिकेत 8 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांना

भेटण्यासाठी गेले असता तु नगर पालिकेत का आलस ? तेरा यहा कुछ नहीं होनेवाल असे एक व्यक्तीने त्यांना सांगितले व जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची आणि बंदुकीचा धाक दाखवतील असल्याची बाब बजरंग वामनराव खोडके यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी फिर्यादीत ‌नमुद केली आहे यावरून मुदखेड पोलिसांनी अनुसूचित जती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार नगरपालिकेचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अन्सारी जागीरदार व अब्दुल सलाम व नगराध्यक्ष यांचे वाहन चालक यांच्यावीरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल आहे उपविभागीय अधिकारी पोलिस बाळासाहेब देशमुख यांनी 10 फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्याल भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे सदर गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी पोलिस बाळासाहेब देशमुख हे करीत आहेत.