Home महत्वाची बातमी तारासावंगा येथे वाघाने पाडला वासराचा फडशा तर लाखनवाडा येथे जखमी

तारासावंगा येथे वाघाने पाडला वासराचा फडशा तर लाखनवाडा येथे जखमी

314

ईकबाल शेख

आष्टी :-  परिसरातील वाडेगाव ,चिचकुंभ,पेठ,माणिकवाडा,जामगाव, लाखनवाडा तारासावंगा शेतशिविरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार आहे.बर्याच नागरिकांची वाट सुध्दा याच वाघाना अडवल्याची चर्चा आहे.मौजा तारासावंगा येथे याच पट्टेदार वाघाणे भल्या पहाटे वासरावर हल्ला करून त्याला जागीच गतप्राण केले.
शेतशिवारात दिवस रात्र राबणारे शेतकरी भयभीत झाले असुन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मौजा तारासावंगा येथील शेतकरी विजय कडू यांच्या मालकिच्या वासरावर वाघाणे हल्ला चढवुन वासराला जागीच गतप्राण केले. तर लाखंनवाडा येथील ज्ञानेश्वर पापडकर यांच्या मालकीच्या वासरावर हल्ला करून वासरास जखमी केले शेतांमध्ये चणा,गहू ही रब्बी पिके असून वन्य प्राण्यांपासून या पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरि रात्रंदिवस शेताची रखवाली करतात. अशावेळी वाघाची दहशत चिंतेत भरटाकणारी आहे. तारासावांगा येथे तिन दिवसांअगोदर पांढूरंग कडू यांच्या बकरिवर सुध्दा याच वाघाने हल्ला करून फडशा पाडला होता. शेतशिवारात भितीचे वातावरण असुन.शेतकर्यांना वन्यप्राण्यांपासुन पिकांचा कि वाघापासून स्वतःचा बचाव कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे वाघाच्या हल्यात गतप्राण झालेल्या वासराची मालकास नुकसान भरपाई मिळून वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.