Home जळगाव लोक संघर्ष मोर्चा तर्फे दुसऱ्या टप्प्यातील आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड वाटप

लोक संघर्ष मोर्चा तर्फे दुसऱ्या टप्प्यातील आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड वाटप

107
0

रावेर (शरीफ शेख)

आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील आदिवासी कुटुंबांना लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या हस्ते रेशनकार्ड वाटप करण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत निकाल दिलेला आहे त्यानुसार लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील सावखेडा, खौशी, तांदळी, गलवाडे, धानोरा येथील दुसर्‍या टप्प्यातील रेशनकार्ड तयार करण्यात आले व आज तहसिल कार्यालय अमळनेर येथे लोक संघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, तहसिलदार मिलिंदकुमार वाघ साहेब,श्रीमती भानुबेन गोशाळेचे चेतन शहा, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे सह प्रा अशोक पवार सर, संदिप घोरपडे सर, भागवत गुरूजी, मधुकर चव्हाण, बालिक पवार, फुलसिंग बारेला, मनोज सोनवणे, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे रियाज शेख यांच्या हस्ते रेशनकार्ड वाटप करण्यात आले या वेळी रावसाहेब नाईक, विठाबाई भिल, सरलाबाई भिल, हिंमत पारधी, रविंद्र साळूंके आप्पा दाभाडे, नाथजी महाराज, सुनिल भिल, रूपचंद भिल, रविंद्र भिल, साहेबराव भिल, योगेश भिल, गिरधर भिल, छोटू भिल, हजर होते आभार पन्नालाल मावळे यांनी मानले.