Home बुलडाणा अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे नवीन ठाणेदारा...

अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे नवीन ठाणेदारा समोर आव्हान?

85
0

हनिफ शेख
अंढेरा/प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील सर्वात मोठे पोलीस स्टेशन म्हणून अंढेरा पोलीस स्टेशनला ओळखले जाते.या पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण सहा वेगवेगळे बिट येत असुन या बिट अंतर्गत तब्बल अठ्ठेचाळीस खेडी/गावे येतात.हे पोलीस स्टेशन गुन्हेगारीसाठी तसेच पोलीस कर्मचारी व ठाणेदारावरील लाचलुचपत विभागाच्या कार्यवाहीसाठी जिल्हा भर प्रसिद्ध आहे.आतापर्यंत गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच ठाणेदारावर तसेच काही बिट जमदारावर पैसे घेतल्याचे म्हणून लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असता त्याच्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण पाच बिट येतात.यामध्ये अंढेरा,मेरा बु!,देऊळगाव घुबे,शेळगाव आटोळ,डिग्रस,अशा बिट येत असुन सदर बिट अंतर्गत अवैध वरली मटका,जुगार,आवैध देशी दारु,अवैध गुटखा विक्री,ब्लास्टिंग टँक्टर,अवैध रेती वाहतुक जोमात सुरु असुन सगळीकडे अवैध धंद्यानी धुमाकुळ घातला आहे.यापुर्वीचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यानी सगळीकडे थैमान घातले असतानां अंढेरा ठाणेदार यांचा अवैध धंदेवाल्यानां वारंवार पाठीशी घालणे तसेच त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही न करणे बुलढाणा येथील एल्सीबी पथकाने अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अनेकदा छापा मारत अवैध देशी दारु,वरली मटका,जुगार तसेच पत्ता क्लबवर छापा मारत अनेकदा कार्यवाही केली.तसेच पोलीस स्टेशन समोरुन अवैध रित्या रेतीची टिप्पर वाहतुक होत असतानां हे प्रकरण महसुल अंतर्गत येत असल्याचे कारण पुढे करत अशा विविध प्रकारच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी या सर्व प्रकाराची दखल घेत अंढेरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची एका आदेशाने तात्काळ नियंत्रण विभाग बुलढाणा येथे बदली करण्यात आली असुन त्याच्यां जागी चिखली येथुन नव्याने आलेले एपिआय राजवंत आठवले यांची अंढेरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली असुन आठ दिवस उलटुन सुध्दा अवैध धंदे जैसे थेच सुरुच आहे.ते बंद करण्याचे आव्हान ठाणेदार राजवंत आठवले यांच्यासमोर उभे ठाकले आहे.आता ते काय कार्यवाही करतात याकडे जिल्हा पोलीस अधिक्षक तथा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Show quoted text