Home बुलडाणा तालुक्यात गुटखा सुगनधित तंबाखू वर लाखोंची उलाढाल

तालुक्यात गुटखा सुगनधित तंबाखू वर लाखोंची उलाढाल

172

 

गुटखाबंदी ठरली नावापुरतीच

प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ,

 

मेरा खुर्द प्रतिनिधी.शेख कौसर.

 

राज्यात सुगंधित तंबाखू गुटखा विक्रिवर शासनाने बंदी घातली आहे तरीही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेश व गुजरात यासारख्या परप्रांतातुन सुगंधित तंबाखू गुटख्याची आवक सुरूच असून मागणी जादा आणि आवक कमी असल्याने या वस्तुचे दरही गगनाला भिडले आहे तरीहि युवा पिढी चढ्या दराने मरणाच्या वाटेवर नेणार्या या वस्तुंची खरेदी करुन आपली तलब भागवत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या वरील बंदीहि कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे परिणामी आजची भावी युवा पिढी या व्यसनामुळे उद्धवस्त होण्याच्या वाटेवर आहे आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्वल भविष्य समजले जाते पंरतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपुणँ असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे एवढेच नव्हे तर सध्या अन्नापेक्षा व्यसन महाग झाले असूनही आजची भावी युवापिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटून गेली आहे दिवसातून किमान दोनदा जेवन घेतले जाते सकाळी न्याहारी , दुपारी व रात्री जेवन अशी पध्दत आहे शरीरासाठी आवश्यक कँलरीज या जेवणातून प्राप्त होतात त्यामुळे शुध्द आणि शाकाहारी जेवणाकडे पूवी’पासुन भारतीयांचा कल राहिला आहे मात्र हल्ली मानवाची जिवनशैलीच बदलली आहे मानवाची दिनचयाँही फार बदलुन गेली आहे शरीराला आवश्यक असणार्या बाबीपेक्षा शरीराला अपायकारक ठरणार्या वस्तुचे सेवन करण्याकडे युवकांचा कल वाढला असल्याचे दिसत आहे
युवापिढी तर भरकटत चालली असल्याचे दिसत आहे शरीराला अपायकारक असणार्या तंबाखू,गुटखा,सिगरेट आदी व्यसनाच्या विळख्यात युवक गुरफटले जात आहेत दिवसातून किमान पाच ते दहा वेळा तंबाखू खर्याचे सेवन केले जात आहे सोबतच सिगारेट धूर वातावरणात सोडण्यातही युवक पुढे आहेत कमी दरजा चा तंबाखू खर्रा किमान दहा रूपयाचा असून विशिष्ट तंबाखू खररा १५ते३० रूपयाच्या घरात आहे हा खररा दिवसातुन पाचवेळा खातो म्हटले तरी किमान १०० ते १५० रूपये दररोज लागतात तंबाखुच्या एका पुडीची किमंत पाच ते दहा रूपये आहे तर सिगारेटची किंमत तिन रूपयापासून ४० रूपयापयँत आहे
साधारणत: तीनही वस्तुंचा खर्च १०० रूपयाच्यावर आहे मात्र तरीही दिवसातून चार ते पाच सिगारेट फुकणारे , चार ते पाच खर्रा खाणारे सर्वत्र दिसतात सवँसामान्याना दिवसातुन किमान दोन खरे लागतात त्याचा खचँ ३० रूपये येतो मात्र तरीही खराँ खाण्यात कसूर केला जात नाही सिगारेटच्या आहारी ही जादा प्रमाणात युवक वर्गच गेला आहे शाळा महाविधालयासमोर असलेल्या पानटपरी व हाँटेलच्या मागे युवक सिगारेट झुरके ओढताना दिसतात
काहि युवक चक्क तंबाखू घोटुन आपली तलफ भागविताना दिसतात तंबाखू गुटखा व सिगारेटच्या पाकिटावर जरी कँन्सरग्रस्ताचा जबडा काढला असला तरी बिना भीती तंबाखू गुख्याचे सेवन केले जात आहे बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवनाचा खचँ केवळ ३०ते ३५ रूपये पडतो मात्र ख्रर्याचा खर्च ४०रूपये पडतो तरीहि त्याचे सेवन सरास केले जाते अन्नापेक्षा व्यसन महाग असूनही युवक त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत शरीरासाठी हानिकारक असलेल्या वस्तुचे सेवनं करीत आहेत मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही वयसनाचा हा विळखा युवा पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसत आहे त्यामुळे युवकांच्या आरोग्याला धोका निमाँण होत आहे त्यासाठी शासनाने अवेध गुटखा विक्रेत्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे