Home बुलडाणा महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेची जिल्हास्तरीय बैठक   ,

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेची जिल्हास्तरीय बैठक   ,

175

 

चिखली येथे समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन

देऊळगावराजा : प्रतीनीधी

नुकतेच वर्धा येथे झालेल्या सभे अन्वये मा.प्रदेशाध्यक्ष रामदास तडस, ना.विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, अशोककाका व्यवहारे, गजानन नाना शेलार,डॉ.भूषण कर्डिले व आ.संदिपभैयाजी क्षीरसागर यांचे संयुक्त सुचने नुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा स्तरीय बैठकीचे आयोजन दि.७ फेब्रूवारी रविवारी रोजी दुपारी १ वाजता चिखली येथे करण्यात आले आहे. समाज बांधवानी बहूसंख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे यांनी केले आहे.

सदर बैठकीत विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात नागपूर येथे महारॅलीचे आयोजन व रॅलीत येणारे समाज बांधवची संख्या, ओबीसी वगार्ला न्याय मिळवून देण्याकरिता होणाºया मेळाव्याच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील विविध ओबीसी समाजांच्या नेतृत्वांना संघटित करणे,  जिल्ह्यातील, तालुक्यातील जनगणनेची माहिती, जिल्हा आणि तालुक्यातील नियुकत्या, या सभेला विभागीय अध्यक्ष उपस्थित राहणार आहे.  नुकतेच वर्धा येथे झालेल्या जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीचा लेखा जोखा मांडण्यात येणार आहे.  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा स्तरीय बैठकीचे आयोजन दि.७ फेब्रूवारी रविवारी रोजी दुपारी १ वाजता इंदिरा बँक च्या सभागृहात बस स्थानका जवळ चिखली  येथे करण्यात आले आहे. समाज बांधवानी बहूसंख्येत उपस्थित राहावे तसेच  जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय सेवा आघाडी युवा आघाडी, महिला आघाडी, जेष्ठ आघाडीच्या  सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुषमाताई राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे यांनी केले आहे.