Home जळगाव ऐनपूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप

ऐनपूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप

168

मराठी भाषा विचारातून आचरणात आणणे गरजेचे – प्राचार्य डॉ.जे.बी अंजने

शरीफ शेख

रावेर , दि. १६ :- निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप करण्यात आला. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषेचा प्रचार व प्रसार महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ग्रंथ दिंडी काढून मराठीतील वेगवेगळ्या ग्रंथांची ओळख करून देण्यात आली. ३ जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करून त्यांचे शिक्षण व मराठी भाषेतील योगदान स्पष्ट करून महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगीरी आदि मराठी साहीत्याची माहीती देण्यात आली. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, काव्य वाचन, नाट्य वाचन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिन अशा विविध कार्यक्रमांचे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमित्त आयोजन करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. जे.बी अंजने हे होते. मराठी भाषा विचारातून आचरणात आणणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. त्यांनी वाचाल तरच टीकाल मराठी हि सर्वश्रेष्ट भाषा आहे. मराठी भाषे बरोबर मराठी शाळेचेही संर्वधन होणे गरजेचे आहे. प्रत्येक इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये मराठी विषय अनिवार्य असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा.एम.के सोनवणे यांनी मराठी भाषा संवर्धनाची गरज आहे असे त्यांनी पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन आफताब खान या विद्यार्थ्यांने केले तर आभार प्रशिक तायडे या विद्यार्थ्यांने मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.