Home बुलडाणा पेट्रोलपंप लुटण्याचा तय्यारीत असलेल्या अट्टल दरोडेखोर जेरबंद ,

पेट्रोलपंप लुटण्याचा तय्यारीत असलेल्या अट्टल दरोडेखोर जेरबंद ,

443

पेट्रोलपंप लुटण्याचा तय्यारीत असलेल्या अट्टल दरोडेखोरांना अटक ,

 

गुन्हा शाखेची कामगिरी ,

अमीन शाह

मेहकर ते डोणगाव रोडवरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तययारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला बुलढाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे . संतोष सिताराम पवार ( वय 31 , रा . चायगाव , ता . मेहकर ) , राजू शिवाजी इंगळे ( वय 25 , रा . बा – हाई पाचला , ता . मेहकर ) , किरण सोपान चव्हाण ( वय 20 , रा . बाहाई पाचला , ता . मेहकर ) , किशोर मामा चव्हाण ( वय 26 , रा . बा – हाई पाचला , ता . मेहकर ) आणि आकाश प्रकाश पवार ( वय 27 , रा . खाखरखेर्डा , ता . मेहकर , मूळचा राहणार बा – हाई पाचला , ता . मेहकर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मेहकर ते डोणगाव रोडवरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपाजवळ सोनेरी रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्ये काही व्यक्ती गुन्हा करण्याच्या तयारीमध्ये दबा धरून बसले आहेत , अशी माहिती पोलिसांना मिळाली . मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात पाहणी केली असता सोनेरी रंगाची स्विफ्ट आढळन आली . पोलिसांनी सापळा रचत अत्यंत शिताफीने कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले . यादरम्यान पोलिसांनी चारचाकी स्विफ्टसह तीन मोबाईल . दोन धारधार चाकू , दोरी , लाकडी दांडके , लोखंडी रॉड आणि मिरची पूड असे साहित्य आणि रोख 3320 रुपये असा 4,34,630 रुपयांचा माल जप्त केला .