Home बुलडाणा केवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले

केवळ 300 रुपायाच्या उधारी साठी वृद्धास मारून टाकले

2617
0

पाच संशयित ताब्यात ,

मोताळा , जी , बुलडाणा –

रहीम शेख ,

उधारीच्या पैश्याच्या वादातून झालेल्या भांडणात 50 वर्षीय वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला . मात्र मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होत नसून , हा खून की हृदयविकाराचा झटका शवविच्छेदनाच्या अहवालाअंतीच स्पष्ट होणार असल्याने धामगणाव बढे पोलिसांनी सध्या 5 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असले तरी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही . ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील रोहिणखेड ता . मोताळा येथे आज , 26 जानेवारीच्या सकाळी घडली .
शेख कदीर शेख रज्जाब ( रा . रोहिणखेड ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे . फारुख शेख मुसा , शाहरुख शेख फारुख , जिया शेख फारुख ,  रियाज शेख फारुख ( सर्व रा . रोहिणखेड ) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे . तीनशे रुपये देत नसल्याने संशयित पाच जण आणि शेख कदीर यांच्यात रात्रीही भांडण झाले होते . आज सकाळीही पुन्हा भांडण झाले . त्यानंतर घरी परतत असतानाच ते कोसळले . यातच त्यांचा मृत्यू झाला . हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची चर्चाही गावात आहे . घटनेची माहिती मिळताच धामगणाव बढे पो.स्टे चे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे , सह दुय्यम ठाणेदार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांनी ही घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे ,