Home विदर्भ आर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का?

आर्वी तळेगांव राज्यमहामार्गाच्या रुंदिकरणात अवैध वाळुचा वापर होत आहे का?

482

 गृहमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली.

ईकबाल शेख

वर्धा – तळेगांव (शा.पं.) :- आर्वी तळेगांव राज्यमहामार्ग हा तसा मागील दोन वर्षापासुन आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांकरीता डोके दुखीच ठरला आहे. मागील दोन वर्षापासुन सुरु झालेल्या या राज्य महामार्गाच्या रुंदिकरणा दरम्यान सुरुवातीला काम सुरु झाले ते कासव गतीने तर ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीने सदर रोडच्या कामाचा काॅन्ट्रक्ट घेतला होता त्या कंपनीने रोडचे खोदकाम करुन ठेवुन मध्यंतरीच काम बंद केले त्यामुऴे रहदारी करतांना मोठ्या प्रमाणात नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर सदर रोडचे काम दुसर्‍या कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले सदर कंपनी या रोडचे काम करीत असुन त्या कंपनीचा सिमेंट काॅंक्रीट मिक्शिगं प्लांट रानवाडी शिवारात आहे. या मिक्शिंग प्लांट मध्ये वापरण्यात येत असलेली वाळु हि विना राॅयल्टीची अवैध वाळु वापरण्यात येत आहे का? सदर वाळुचे डम्पर दिवसाढवळ्या प्लांटवर खाली होत असुन सुद्धा याकडे महसुल विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. नुकतेच दोन दिवसापुर्वी राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख वर्धा येथे आले असता त्यांनी आढावा बैठकी दरम्यान जिल्हात अवैध रेती चोरीला पोलीस व महसुल विभागाने पायबंद घालण्याचे निर्देश दिले. परंतु दोन्हि विभागाकडुन त्यांनी दिलेल्या निर्देशाची अमलबजावनी केली नसुन चक्क त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे राजरोसपणे रानवाडी शिवारातील मिक्सिग प्लांटवर अवैध रेतीचे डम्पर खाली होत असलेल्या चित्रावरुन दिसुन येते. यामध्ये नक्कीच कोठे तरी पाणि मुरत असावे हे स्पष्ट होते. तेव्हा याकडे वरिष्टांनी लक्ष देण्याची गरज आहे.