Home बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,

बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन ,

435

प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी ,

अमीन शाह

बुलडाणा

चिखली तालुक्यातील भानखेड येथील मृत पक्षांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . भोपाळ येथील लॅबवरून आज अहवाल प्राप्त झाला . बर्ड फ्ल्यू येणार अशी शक्यता होती . अखेर हा आजार आलाच ! याला अधिकृत दुजोरा अजून तरी कुण्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही . पशु संवर्धन विभागाच्या सुत्रांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे . एकुण ४ कोंबड्यांच्या रिपोर्ट पैकी केवळ एका कोंबडीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . शेतकरी जनार्दन इंगळे यांनी त्यांच्या शेतात 200 देशी कोंबड्यांचे पॉल्ट्रीफार्म सुरू केले होते . 23 जानेवारीला सकाळी कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले होते . याच गावातील इतर नागरिकांच्याही एक – दोन अशा काही कोंबड्या दगावल्या होत्या . या प्रकाराची माहिती मिळताच पशूधन तालुका अधिकारी डॉ . दांडगे , पशूवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ . युवराज रगतवान , पर्यवेक्षक डॉ . प्रवीण निळे , डॉ . पूनम तायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला . तीन कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठवले . भोपाळ येथील वरिष्ठ प्रयोगशाळेतून मृत कोंबड्यापैकी एका कोंबडीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . या सर्व प्रकारावरून जिल्ह्यात बर्ड फ्लू दाखल झाला असे दिसून येते . पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे . पुढील आवश्यक कार्यवाही म्हणजे बाधीत क्षेत्र व निगराणी क्षेत्र घोषीत करणे , कलिंग करणे आदी उपाययोजना पशुसंवर्धन विभाग करत आहे . नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही , असे आवाहनही पशु संवर्धन विभागाच्या अधिका – यांनी केले आहे . 21 दिवस हा क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन ही प्रशासना तर्फे करण्यात आले आहे ,