Home बुलडाणा बुलडाण्यात चोरट्यांनी आर टी वो मॅडम च्या घरावर मारला डल्ला

बुलडाण्यात चोरट्यांनी आर टी वो मॅडम च्या घरावर मारला डल्ला

206
0

 

नगदी व दागिने लंपास ,

अमीन शाह

बुलडाणा शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे . दोन घरे फोडून ५६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुलडाणा शहरातील सरस्वतीनगरात १७ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर घडली आहे . उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री विजय दुतोंडे ( ४८ , रा.सरस्वतीनगर ) या घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरामधील १२ हजार रुपये नगदी व ३ ग्रॅम व ५ ग्रॅमची अंगठी किंमत अंदाजे १५ हजार रुपये असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . जयश्री दुतोंडे यांच्याच बाजूला राहणारे विनायक श्रीराम पाटील ( ६२ ) यांच्याही घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील २३ हजार रुपये रोख रक्कम व २ चांदीचे देव ३० ग्रॅमचे ( किंमत २४०० रुपये ) , चांदीचा दिवा किंमत अंदाजे १००० रुपये , सोनाटा कंपनीची घड्याळ किंमत ३००० रुपये असा एकूण २ ९ , ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला . जयश्री दुतोंडे व विनायक पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची तक्रार दिली आहे . पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . तपास शहर ठाणेदार प्रदीप साळुके यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय अभिजीत अहिरराव करत आहेत .