

अमीन शाह
पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्यात, प्रेम प्रकरणातून पोलीस कॉन्स्टेबलने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीत घडली आहे. त्यानुसार संबंधित कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल निरावणे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्स्टेबलचं नाव आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक आणि आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेम संबंध होते. मात्र, महिला अधिकारी इतरांना बोलत असल्याचा राग कॉन्स्टेबल अनिलला अनावर होत होता. याच वादातून महिला अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत, कॉन्स्टेबल अनिलने दिघी पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडत होते. कॉन्स्टेबल अनिलला महिला अधिकारीचे इतरांना बोलणं आवडत नव्हतं. यावरून त्यांच्यात शाब्दिक आणि किरकोळ भांडणही होत असे
बातमी सोबत वापरलेला फोटो काल्पनिक चित्र आहे ,











































