Home बुलडाणा बोडखा ते संग्रामपुर पंचायत समिती डांबरीकरण रसत्याचे काम निकृष्ट दर्जाचे डांबर ऐवजी...

बोडखा ते संग्रामपुर पंचायत समिती डांबरीकरण रसत्याचे काम निकृष्ट दर्जाचे डांबर ऐवजी चकक ऑईलचा वापर सा बा विभागाचे दुर्लक्ष ?

80
0

चौकशी ची मागणी ,

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील बोडखा ते तामगाव मार्गे संग्रामपुर पंचायत समिती पर्यत ४ कि मीटर रस्ताचे काम पुर्वी पासुनच निकृष्ट दर्जाचे झाले असुन स्वयघोषीत पुढाऱ्यांनी कंत्राटदारा कडून चिरीमिरी घेतल्याने पुर्वी विरोध केला नंतर युटर्न घेत समर्थन त्यामुळे स्वयघोषीत पुढारी मुंगगिळून असल्याने बोडखा ते तामगाव मार्गे पं समिती पर्यत रसत्यात योग्य खुदाई न करता खडीकरणाचे काम थातुर मातुर करण्यात आल्याने रसत्याची दबाई योग्य रित्या न केल्याने नांदुऱ्याच्या कंत्राटदारांने मनमानीपणा सुरुच ठेवला त्यात दिर्घ महिण्या पासुन थंड बसत्यात पडलेले काम गेल्या दोन दिवसा पासुन डांबरीकरण काम चालु आहे मात्र कंत्राटदार बोडखा ते संग्रामपुर पर्यत ४ कि मी पर्यत रसत्याच्या कामात डांबरचा वापर नगण्य असुन जळालेले आईलचे प्रमाण जास्त प्रमाणात करित असल्याने या रसत्याच्या कामाकडे सा बां विभागाचे अक्षम दुर्लक्ष होत असुन त्यात राजकिय पुढा ऱ्यानी चुप्पी साधुन असल्याने सदर रसत्याचे निकृष्ठ काम सुरुच असल्याने व डांबरीकरण कामात डांबर ऐवजी चक्क जळालेले ऑईलचा वापर होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग गुण नियंत्रक विभागाच्या संबंधीत अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन बोडखा ते तामगाव मार्गे पं समिती पर्यत डांबरीकरण सुरु असलेल्या रसत्याच्या कामाची चौकशी करणे गरजेचे आहे अशी मांगणी बोडखा सुज्ञ नागरिक व ग्रामस्था कडून जोर धरत आहे