Home विदर्भ डीएफओ श्रीखंडे व ईतरांविरुद्ध अपहार व फसवणुक केल्या प्रकरणी अधिकचा तपास करुन...

डीएफओ श्रीखंडे व ईतरांविरुद्ध अपहार व फसवणुक केल्या प्रकरणी अधिकचा तपास करुन न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी

50
0

यवतमाळ :-  घाटंजी तालुक्यातील कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची सरपंच असतांना त्यांची खोटी सही करून व बनावट रबर स्टॅम्प तयार करुन मोहदा पोष्टातुन शासनाच्या रकमेचा विड्राल करुन अपहार व फसवणुक केल्या प्रकरणी अडीच वर्ष लोटुनही घाटंजी न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकचा तपास करुन पारवा पोलीसांनी अहवाल सादर केला नसल्याने, सदरचा अहवाल दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दिन सोलंकी यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे कडे ईमेल द्वारे केली आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात राजकीय दबावाखाली घाटंजी न्यायालयात अधिकचा तपास करुन पारवा पोलीसांनी अहवाल सादर केलेला नाही, असा आरोप अयनुद्दीन सोलंकी यांनी केला आहे. 

◼️कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी हे सरपंच असतांना त्यांची खोटी सही मारुन, खोटा रबर स्टॅम्प तयार करुन व कट रचुन मोहदा पोष्टातुन लाखो रुपयांचा विड्राल करुन शासनाच्या रकमेचा अपहार करुन फसवणूक केल्या प्रकरणी पारवा पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार केली होती. मात्र, पारवा पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हे नोंदविले नसल्याने फिर्यादी अयनुद्दिन सोलंकी यांनी घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सीआरपीसी १५६ (३) अन्वये फौजदारी याचीका दाखल केली होती. परंतु; अगोदर पारवा पोलीसांनी गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ केली. मात्र, त्यानंतर पारवा ठाणेदार पंजाब वंजारी यांनी संशयीत आरोपी डीएफओ डी. बी. श्रीखंडे, तहसीलदार संतोष शिंदे, वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी, कंत्राटदार व कुर्ली येथील रोहयो मजूर आदीं अकरा आरोपी विरूध्द अपहार व फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पारवा पोलीसांनी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी एम. केस अपराध क्रं. ९०/१६ अन्वये भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब), ४६७,४६८, ४१७, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात भक्कम पुरावे असतांना सुध्दा पारवा ठाणेदार यांनी न्यायालयात ब समरी फायनल ११/१७ दि. ३१ जुलै २०१७ रोजी दाखल केला. अगोदर ठाणेदार पंजाब वंजारी व नंतर ठाणेदार अनिल राउत यांनी या प्रकरणाचा तपास केला. सदर प्रकरणात साक्षीदार व लेखी पुरावे असतांना पारवा पोलीसांनी राजकीय दबावाखाली घाटंजी न्यायालयात ब समरी फायनल ११/१७ दि. ३१ जुलै १७ रोजी पाठविला. या प्रकरणी फिर्यादी अयनुद्दिन सोलंकी यांचे तर्फे अँड. जगदीश वाधवानी (यवतमाळ) यांनी घाटंजी न्यायालयात आक्षेप अर्ज दाखल करुन युक्तिवाद केला. सदर प्रकरणात घाटंजी न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रभुषन ओंडरे यांनी ब समरी फायनल फेटाळून अधिकचा तपास करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी पारवा पोलिसांना दिले. मात्र, पारवा पोलीसांनी अडीच वर्ष लोटुनही घाटंजी न्यायालयात अधिकचा तपास करुन अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० व ईतर प्रकरणात अधिकचा तपास करुन घाटंजी न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी, यवतमाळ व पांढरकवडा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. या पुर्वी सुध्दा पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे कडे सदर प्रकरणात तक्रार करण्यात आली होती, हे विशेष.