बुलडाणा

पळून गेलेल्या त्या विवाहित प्रेमीयुगुलाने विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न,

 

अमीन शाह

 

बुलडाणा ,

काही दिवसापूर्वी पोफळ शिवणी या खेडेगावातून बेपत्ता झालेले ते दोघेजण विवाहित प्रेमीयुगल निघाले असून प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या या प्रेमी युगलाने गावात येऊन साथ जियेंगे साथ मरेंगे म्हणत विष प्राशन केल्याची खळबळ जनक घटना घडली असून सदर प्रेमी युगल हे पोफळ शिवणी या एकाच गावातील भावकी मधील असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत

याबाबत मिळालेली माहिती अशी की पोफळ शिवणी येथील दोन मुलाचे वडील असलेला नितीन आडे या विवाहित तरुणाचे गावातीलच भावकी मधील एका दोन मुलाच्या आईशी सूत जमले त्यानंतर दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या त्यानंतर सदर प्रेमिका महिला माहेरी वरुड या गावी जाते म्हणून घरातून निघून गेली आणि त्याच वेळेस गावातील नितीन आडे विवाहित तीन मुलाचा वडील हा देखील बेपत्ता झाला याप्रकरणी नितीन आडे यांच्या घरच्यांनी नितीन बेपत्ता झाल्याची तक्रार साखरखेरडा पोलीस ठाण्यात दिली होती तर त्याच वेळेस वरवंड येथील सदर महिलेच्या घरच्यांनी महिला हरवल्याची बेपत्ता झाल्याची तक्रार डोनगाव पोलिसात दिली होती त्यावरून पोलिसांनी शोध घेतला असता शोध सुरू असताना सदर प्रेमीयुगल हे अचानक आपल्या गावी साखर खेर्डा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पोफळ शिवणी या त्यांच्या गावी परत आले आणि गाव बाहेरच्या शेतातल्या एका कोठ्यात थांबले असता याची कुणकुण गावकऱ्यांना लागली त्यामुळे गावातील काही जण तिथे गेले असता त्यांना सदर प्रेमी युगल दिसले त्यामुळे आता गावातील लोक आपल्याला मारतील आणि वेगळे करतील या भीतीने सदर विवाहित प्रेमी युगलाने विषाचा घोट घेतला हे काही गावकऱ्यांनी पाहताच त्यांना उपचारासाठी बीबी येथे नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे ,

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752