विदर्भ

गरजू व गरीब नागरिकांना अथांग फाउंडेशन , यवतमाळ  च्या वतीने गौरव इंगळे यांचा मदतीचा हाथ…!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – सध्याची परिस्थिती पाहता कोरोना काळ सुरूच आहे त्यात दिवाळी हा सन आला कोरोना काळात अनेकांची कामे बंद झाली, हातावर पोट असणाऱ्या अनेक गरिबांना हालाकीच जीवन जगण्या खेरीज दुसरा मार्ग राहिला नाही. सरकारने आपल्या परीने होईल ती मदत केली परंतु ती सर्वच गरजून पर्यंत पोहोचलीच अस नाही आज ही बरेच गरजू मदतीच्या प्रतीक्षेत आहे यातच दिवाळी हा सन आला दिवाळीचे भारतीय सणात काय महत्व आहे हे वेगळ सांगायला नको.
याचाच विचार करून अथांग फाउंडेशन यातमाळ चे अध्यक्ष श्री.गौरव विनोद इंगळे आणी न्यू मायनॉरिटी मल्टीपर्पज अँड एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष जनाब मोहम्मद नासिर नियाझी तसेच पवन वायकर सचिव समृद्धी बहुउदेशीय संस्था, व राजेश गजभिये यांनी पुढाकार घेऊन यवतमाळ येतील ३० गरजूना ब्लॅंकेट वाटप केले, त्याच सोबत फराळाचे प्याकेट्स आणी १० बेवारास कुटुंबाना १ महिन्याचे किराणा सामान घेऊन दिले लोक वर्गणीतून त्यांनी हे समजूपायोगी आणी अत्यंत गरजेचे असे माणुसकीची ओळख देणारे कार्य पार पडले.
यावेळी अथांग फाउंडेशन यवतमाळ चे अध्यक्ष गौरव विनोद इंगळे यांनी आपले मत मांडले ते म्हणाले कि आजही माणुसकी जिवंत आहे गरज आहे तर आपल्यात दडलेला अहंकार बाजूस सारून गोरगरिबांचे दुःख जाणण्याची आपण सर्वांनी जर विचार केला आणी एकत्र येऊन काम केले तर आपण खूप कही करू शकतो आज समाजात असंख्य लोक आहेत जे आर्थिक दृष्टया सक्षम आहेत पण सामाजित कार्यात भाग घेत नाहीत परंतु आता त्यांनी पुढे येण्याची गरज आहे कारण समाजाला आता त्यांची गरज आहे. गरजू साठी तोच देव ठरतो जो त्याला संकटात कमी पडतो म्हणून आपल्यात लपलेला देव आपणच बाहेर काढला पाहिजे आणी समाजाप्रती आपले कही कर्तव्य आहे याची जान ठेवली पाहिजे पुढे त्यांनी आव्हाहन केले कि ज्यांनाही समाजसेवेत रस आहे अश्या प्रत्येकाने आमच्या सोबत जॉईन व्हा आपण सर्व एकत्र येऊन कही तरी चांगल करण्याचा मानस नक्कीच पूर्तीस आनु शकतो.

गौरव विनोद इंगळे

9405500485

Tags

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752