विदर्भ

अमरावती शिक्षक मतदार संघात शिक्षकाचा उमेदवार शिक्षकच असावा – आ. नागो गाणार

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

शिक्षकांच्या मतदार संघात संस्थापक, गैरशिक्षक, राजकीय पक्षाच्या उमेदवारा पासून शिक्षकांनी सावध राहून राजकुमार बोनकीले यांना निवडून आण्याचे केले आव्हान

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे जिल्हा बैठकीचे आयोजन दिनांक 20 नोव्हेंबर रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय सभागृह येथे आयोजन करण्यात आले. या जिल्हा बैठकीचे अध्यक्षस्थानी ताराचंद चव्हाण जिल्हा अध्यक्ष, म. रा. शि. प., तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दिवाकर पांडे, शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक उमेदवार राजकुमार बोनकीले, राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद भेंडे, संजय येवतकर राज्य संयोजक पेन्शन बचाव कृती समिती हे यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होते. यावेळी या बैठकीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह राजेश मदने यांनी केले. तसेच माजी शिक्षक आ. दिवाकर पांडे यांनी शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच का असावा याचे उदाहरणसह स्पष्टीकरण केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, हि राज्यव्यापी संघटना असून या संघटनेचे कर्तव्यदक्ष, उमेदवार राजकुमार बोनकीले यांना क्रमांक 1 चे मतदान करून भरघोस मतांनी निवडून आण्याचे आव्हान केले. तर याच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असलेले मा. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आपले विचार वेक्त करताना सांगितले की, शिक्षक मतदार संघात आज संस्थापक, गैरशिक्षक, व राजकीय पक्षाच्या उमेदवारा पासून शिक्षकांनी सावध राहून आज सद्सद विवेक बुद्धीने यावेळी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेंच आज राज्यात शिक्षकांच्या अनेक समस्या उभ्या असताना अनेक राजकीय पक्षांनी शिक्षक मतदार संघात घुसखोरी करून शिक्षकांसमोर मोठी समस्या निर्माण केली आहे.राज्यघटनेने शिक्षकाना विधान परिषद मध्ये प्रतिनिधित्व दिले असतांना मस्तवाल राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहे. तसेच राजकारणात शिक्षण असावं पण शिक्षणात राजकारण नसावे असे सांगून, राजकीय, संस्थापक, गैरशिक्षकी, उमेदवाराना नाकारून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत शिक्षक उमेदवार राजकुमार बोनकीले यांना क्रमांक एक चे मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आव्हान यावेळी केले. या यवतमाळ जिल्हा बैठकीत सध्याची कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व नियम, सूचनांचे पालन करून सदर यशस्वी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे च्या कार्यकर्ते मध्ये उत्साह संचारला असून श्री राजकुमार बोनकीले यांनी शिक्षक मतदार संघाच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. तर या कार्यक्रमाचे संचालन संतोष पवार यांनी तर आभार प्रदर्शन सचिन देशपांडे यांनी केले.यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752