Home बुलडाणा साखरखेर्डा तलाठी  प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

साखरखेर्डा तलाठी  प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

329

साखरखेर्डा तलाठी  प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

बुलडाणा

साखरखेेेडा मडळाधिकारी कार्यालयात कामकाज करीत असतांना एका इसमाने कार्यालयात घुसून तलाठी पोंधे यांना मारहाण करुन चावा घेतला . आणि सामानाची नासधूस केल्या प्रकरणी आरोपीस विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
साखरखेर्डा येथील पाण्याच्या टाकी जवळ तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालय असून या कार्यालयात प्रशांत शंकरराव पोंधे आणि संजय शिंगणे हे कामकाज करीत होते . दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहन दत्तू गवई रा . हिवरखेड ता . खामगाव यांचा मोबाईल वर फोन आला . पोंधे यांना भेटायचे आहे . मी कार्यालयात आहे , आपण भेटू शकता . त्यानंतर काही वेळातच सदर व्यक्ती कार्यालयात आला .आणि पोंधे कोन आहेत , त्यांना मला भेटायचे आहे . तलाठी यांनी परिचय देवून माझ्या सोबत काय काम आहे . ते सांगा . दत्तू गवई हे माझे वडील असून त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही . अनुदान यादी पाहून सांगतो असे पोंधे यांनी म्हणताच मोहन गवई यांनी शिवीगाळ करून पोंधे यांना खुर्चीतून ओढून खाली पाडले . लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रिंटर मशिन दोन्ही हातात धरुन जमिनीवर आदळले . त्याच्या तावडीतून सुटका करीत असतांना पोंधे यांच्या डाव्या हाताच्या आंगठ्याला कडाडून चावा घेतला . बोटातून रक्तश्राव झाला . गवई आणि पोंधे यांना सोडविण्यासाठी तलाठी संजय शिंगणे , कोतवाल शुभम अशोक कोतवाल , एकनाथ तुपकर यांनी पोंधे यांना सोडविले .
तलाठी प्रशांत पोंधे यांच्या तंक्रारीवरुन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आरोपी मोहन दत्तू गवई वय ४० वर्ष रा हिवरखेड , ता . खामगाव , जि . बुलडाणा यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतीबंधक अधिनियम कायद्या नुसार गुंन्हे दाखल केले आहेत .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे हे करीत असून तलाठी प्रशांत पोंधे हे जिल्हा तलाठी संघटनेचे जीला उपाध्यक्ष आहेत ,