बुलडाणा

चर्मकार समाजाच्या युवतींवरील अन्यायाची चौकशी करुन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची मागणी

 

बुलडाणा/प्रतिनिधी
चर्मकार समाजाच्या मुलींवर बलात्कार करनाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना जेष्ट नेते लक्ष्मणराव घूमरे,इंजि.डी.टी.शिपणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषदेनी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये कुणाच्याही अध्यात मध्यात न जाता गुण्या गोविंद्याने राहत असलेल्या तसेच काबाडकष्ट करून जीवन जगत असलेल्या अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पुरुष, महिला व युवक, युवतींवर वर्णद्वेषी, धर्मांध व जातीयवादी भावनेतून अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्याय अत्त्याचार वाढलेले आहेत. आमच्या आया बहिणींच्या इज्जती लुटल्या जात आहेत. नेकांचे बळी जात आहेत. रोज कुठे ना कुठे असे भयंकर प्रकार घडत आहेत. मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी पाडळी ता.राधानगरी जि. कोल्हापूर येथील 20 वर्षीय चर्मकार तरुणीवर दोन जातीयवादी उच्चवर्णीय नराधम तरुणांनी क्रूर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी सदर युवतीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन व विवस्त्र करुन तिचे अवमानजनक फोटो काढले.
अशीच माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना जळगांव जिल्हयातील पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील 20 वर्षीय चर्मकार समाजातील तरुण मुलीबाबत घडली आहे. बीएससी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या मुलीवर टोळी या गावातील उच्चवर्णीय समाजातील तरुणांनी तिचे अपहरण करुन गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक पाशवी बलात्कार केला. नंतर विष पाजून जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. ती मेली असे समजून मळ्यात टाकून आरोपींनी पलायन केले, परंतु ती जीवंत असल्याचे पाहून कुणीतरी तिला पारोळा येथील रुग्णालयात भरती केले. नंतर कुणीतरी तिच्या मामाला कळविले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे नेत असताना या तरुणीचा वाटेतच मृत्यू झाला. तत्पूर्वी तिने आपल्या आईला सांगितले की टोळी येथील तीन उच्चवर्णीय जातीयवादी नराधमांनी सात नोव्हेंबरच्या रात्री तिच्यावर अनेकवेळा सामुहिक बलात्कार केला आहे. एका अनोळखी महिलेने त्या नराधमांना मदत केली आहे.
आपदग्रस्त मुलीच्या मानाने या प्रकरणी रितसर फिर्याद दिली असून पारोळा पोलीस स्टेशन येथे दहा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास हलगर्जीपणा केला. स्थानिक समाज बांधवानी आंदोलन केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली, त्यानंतर रात्री बारा वाजता मयत तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दोन्ही संतापजनक घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, आपदग्रस्त कुटुंबाला तात्काळ प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत करण्यात यावी, दोन्ही आपदग्रस्त कुटुंबांचे तात्काळ सरकारी घर देऊन जिल्ह्याच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, ही दोन्ही प्रकरणे जलदगती न्यायालयात वर्ग करुन लवकर न्याय मिळण्यासाठी शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा आणि लवकरात लवकर सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, राज्यात अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अमलबजावणी करण्यात यावी, तसे सर्व पोलीस स्टेशनला स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावेत, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, महामंडळाचे भाग भांडवल वाढवून देण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे.
उपरोक्त सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन तात्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला द्यावेत नसता येणाऱ्या काळात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने सर्वत्र तीव्र आंदोलने करण्यात येईल असा इशाराही संघटनेणे दिला आहे.सदर निवेदनावर राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले,युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे,राज्य उपाध्यक्ष के एम वैरी डॉ कैलास गवई ,जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे,जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. शिवजी जोहरे,समाधान चिंचोले यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752