Home महत्वाची बातमी पारोळ्या तालुक्यातील टोळी ह्या गावी घडलेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कार्यवाही वंचित बहुजन...

पारोळ्या तालुक्यातील टोळी ह्या गावी घडलेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कार्यवाही वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुक्याच्या वतीने मागणी

41
0

रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील पारोळ्या तालुक्यातील टोळी ह्या गावी ह्या महिन्यात जिल्ह्यातील अत्याचाराची दुसरी घटना असून ती अत्यंत चीड आणणारी व निषेधार्ह आहे.

पारोळा तालुक्यातील टोळी गावची वीस वर्षाची विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणा-या मुलीबाबत हे घडले आहे. मामा कडे आलेल्या मुलीचे तिथून तीन मुलांनी अपहरण करून एका बाईकडे घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामुदायिक अत्याचार करण्यात आला.त्या पिडीत मुलीच्या मामानी सात तारखेला पोलीस स्टेशनला केस नोंदवायला गेले असता. “अश्या मुली घरातून निघून जातात तू नातेवाईक व तिच्या मैत्रीणीकडे चौकशी कर असे किवा तुझी भाची एखाद्या मुला बरोबर पडून गेली असेल”, असे सांगून पोलीस स्टेशन पारोळा मधून परत पाठवले गेले.अत्याचार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास महाराष्ट्र पोलीस सातत्याने टाळाटाळ करतात. दुसऱ्या दिवशी आंदोलन केल्या मुळे केस नोंदवली गेली. मात्र नंतर ती मुलगी सापडल्या वर पोलीस ती बोलण्याच्या स्थितीत असताना सुध्दा तिचे स्टेटमेंट कोणा महिला अधिकारी कर्मचाऱ्या कडून नोंद करून घेत नाहीत.त्यामुळे तिचा मृत्यु १० तारखेच्या पहाटे ४ वाजेला झाला. सकाळी नातेवाईक आम्ही मुलीचे प्रेत गुन्हा नोंदवल्या शिवाय ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा घेई पर्यंत गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करत नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.आघाडी सरकारच्या काळात पोलिसांच्या अश्या वर्तना मध्ये कमालीची वाढ झालेली आहे.या मागणीचे निवेदन रावेर येथील नायब तहसिलदार सी जी.पवार यांना रावेर तालुका वंचित बहूजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सबब वंचित बहूजन आघाडी पुढील मागण्या करीत आहे.

१) सदर प्रकरणात ३० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात यावा.निष्णात वकील लावून जलदगती न्यायालयात खटला चालवून ६० दिवसात आरोपींना फाशी देण्यात यावी.

२)मुलीच्या परिवाराला पुरेसे संरक्षण व त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.

३)आरोपींना फाशीची शिक्षा देण्याकरीता विविध न्यायालयात जाण्यासाठी मुभा न देता निकाल लागताच केव्हेट दाखल करावेत.

४) मुलीच्या परिवाराला मनोधैर्य योजनेचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या प्रमाणे संरक्षण व लाभ मिळावा

५)जिल्ह्यात अश्या घटना टाळण्यसाठी पोलीस स्टेशन च्या महिला संबंधी असलेला विभाग अधिक कार्यक्षम करावा

६)गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीचा योग्य ट्रॅक ठेवावा.

७. अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणात समाज कल्याण विभागाचे वतीने दिली जाणारी आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी.

८) अत्याचारीत मुलीच्या परिवाराला (कुटुंबाला) शासनाकडून २५ लाखाची मदत मिळाली पाहिजे
वरील मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.याची शासनाने नोंद घ्यावी

विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
निवेदन सादर करित आहे
निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष रफ़िक़ बेग रशीद बेग, रावेर तालुकाध्यक्ष बाळू राजाराम शिरतुरे, तालुका उपाध्यक्ष सलीम शाह यासीम शाह, तालुका सर चिटणीस कांतीलाल गाढे, तालुका सचिव ज्ञानेश्वर तायडे, अर्जुन वाघ, कोषाध्यक्ष जलील खान जहीर खान,नितीन तायडे,सिताराम तायडे, किसन गाढे, दिलीप पानपाटील, श्रावण पाटील,कैलास धनगर नरेंद्र गाढे, गौतम अटकाळे, संतोष नायके, रविंद्र मेढे यांच्या निवेदनावर सहया आहे.