Home महत्वाची बातमी आयटा रावेर युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ

आयटा रावेर युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ

115

आयटा रावेर युनिट तर्फे बक्षीस वितरण समारंभ
रावेर (शरीफ शेख )
येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे कुरआन कुईज परीक्षा स्पर्धा १५/३/२०२० रोजी घेण्यात आली होती.
या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवून यशस्वी
झालेले विद्यार्थ्यांना
ट्राफि, मेडल व
प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठनांने करण्यात आली.
स्पर्धा चे बक्षीस वाटप रावेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर येथे संपन्न झाले .कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी ईकरा एज्युकेशन सोसायटीचे चे अध्यक्ष अब्दुल करीम सालार होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव सैय्यद शरीफ मुंबई जिल्हाध्यक्ष साजिद शेख, अॅड एस एस सैय्यद, आरीफ भाई, अब्दुल समद शेख , माजी मुख्याध्यापक सलीम नयाज मोहम्मद, अँग्लो उर्दू हायस्कुल चे मुख्याध्यापक
मेहमूद शेख, अलहसनात उर्दू हायस्कुल चे मुख्याध्यापक शकील खान, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख ,
उर्दू केंद्र चे केंद्र प्रमुख रईसोद्दीन शेख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख डॉक्टर शकील सईद, मुस्तुफा खान (अमीर सहाब)
शफीयोद्दीन शेख (शफीसर ),
आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम गटातील तीन स्पर्धकांना व दुसऱ्या गटातील तीन स्पर्धकांना प्रथम दुसरे व तिसरे पारितोषिक वितरण करण्यात आले .यात गट पहिला फिरदोसजहा सैय्यद निसार (प्रथम ), अरिबा शेख जावेद( दुसरा ),माविया शेख अतिक
अहमद ( तिसरा) ,तर दुसऱ्या गटात अल्फिया शेख जावेद (प्रथम) आस्मा शेख सलीम (दुसरा) मोहम्मद जैद शेख जब्बार (तिसरा) असे स्पर्धा विजेत्यांची नावे असून यावेळी डॉक्टर करीम सालार यांनी शिक्षणाचे महत्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अब्दुल सादिक सर यांनी केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून
डॉक्टर शकील खान, अजिज सर खानापूर, सलीम खान खिरवड, मुबारीस तडवी लोहारा, मोहम्मद अखतर ऐनपूर यांनी कामकाज पाहिले यशस्वीतेसाठी आयटा युनिट रावेर चे अध्यक्ष मोहम्मद शफिक, सचिव मोहसीन खान, शेख शरीफ, सैय्यद सलमान,
जुबेर अहमद, फरहान अहेमद, शाहरुख शेख, रिजवान शेख,
सैय्यद मुजाहिद शेख आदींनी परिश्रम घेतले.