बुलडाणा

कोरोना बाधित रुग्णांना गृहविलगिकरणात ठेवू नका सणासुदीच्या काळात होऊ शकतो करोनाच्या भडका…मंगेश तिडके

 

 

देऊळगाव राजा – अनेक देश पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वळत आहे राज्यात ही करोना ची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून राज्यात नवीनच होम कॉरोंटाइन ची नव्याने पद्धत सुरू केल्यामुळे अनेक कोरोना बाधीत रुग्ण हे घरात न थांबता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता खुले आम फिरत आहे तसेच सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत नाही या मुळे शहरात करोना चा उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून आता सणासुदीचे दिवस असल्याने बाहेर गावी कामानिमित्त असणारे लोक हे आपल्या स्वगृही परत येत आहे त्यांची ही तपासणी होणे गरजेचे आहे दिवाळी साजरी करत असतांना ही सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळले जावे प्रशासनाने या विषयाची गंभीरपणे दखल घेऊन गृह विलगिकरण करणे तात्काळ थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मांगनि शहरातील सामाजीक कार्यकर्ते मंगेश तिडके यांनी पालकमंत्री राजेंद्रजी शिंगणे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्याकडे केली आहे ,

काळजी घेण्याची गरज ,

आजच राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील लोकांना समबोधित करतांना सांगितले की एक करोना बाधित रुग्ण हा 400 चांगल्या लोकांना बाधित करू शकतो याचा विचार करून प्रशासनाला गृह विलगिकरन ही पद्धत बंद करणे गरजेचे आहे ,

——————-///——————-
संबंधीत विषयाची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उचित अहवाल सादर करणार आहोत…

सारिका भगत

तहसीलदार देऊळगाव राजा

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752