बुलडाणा

रायपूर येथील सपना हत्या प्रकरणात अल्पवयीन भावास अटक

लहान भावानेच केली बहिणीची हत्या ,

दगडाने ठेचून खून ,

अमीन शाह ,

बुलडाणा , तालुक्यातील रायपूर या गावी काल रात्री एका मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता या मुळे परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी आज पोलिसांनी मृतक मुलीच्या अल्पवयीन चुलत भावास अटक केली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार काल रायपूर येथील एका शेतात राहत असलेल्या व दहाव्या वर्गात शिकत असलेल्या सपना जमदाडे हिची अज्ञात वयक्तीने दगडाने ठेचून त्याची हत्या केली होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आज तपास केला असता समजले की मृतक हिच्या घरातून दोन दिवसा पूर्वी मोबाईल चोरीस गेला होता मोबाईल कोणी चोरला हे मृतक ला माहीत होते म्हणूनच तिची हत्या झाली ,

चोरी लपविण्यासाठी हत्या ,

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितीन उर्फ गोलया जमधाडे 15 हा मृतक मुलीचा चुलत भाऊ आहे त्याला मृतक मुलीच्या घरातील सर्व माहिती होती त्याने तीन दिवसा पूर्वीच त्यांच्या घरातून मोबाईल चोरला होता आज ही त्याने सपना च्या घरातून काही पैसे चोरले ही बाब मृतक ने पहिली आता आपले बिंग फुटणार आपण केलेल्या गैर कृत्याचे बिंग फुटणार या भीती पोटी गोळ्या ने सपना च्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केली , ही गोष्ट गोळ्या च्या आई वडील यांना होती मात्र त्यांनी ही बाब लपविली परंतु पोलीस त्यांच्या पर्यंत पोहोचलेच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया , पोलीस उप अधीक्षक बजरंग बनसोडे एस डी , पी , ओ , बरकते ठाणेदार वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहे

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752