Home बुलडाणा साखरखेर्डा ठाणेदार संग्राम पाटील सह 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ,

साखरखेर्डा ठाणेदार संग्राम पाटील सह 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ,

853

 

बुलडाणा ,

पोलीस उप महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र,अमरावती चंद्र किशोर मीणा यांच्या 30 ओक्टोबरच्या आदेशाने बुलडाणा जिल्ह्यातील निःशस्त्र पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यात प्रामुख्याने बुलडाणा एलसीबीचे प्रमुख महेंद्र देशमुख, साखरखेर्डा ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह 17 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व इतर विभागात कार्यरत अधिकाऱ्यां मध्ये एपीआई प्रवर्गचे विक्रांत पाटील, संग्रामसिंग पाटील, जनार्दन शेवाळे, मालती कायटे तसेच पीएसआई प्रव्रगातील इमरान इनामदार,मुकुंद देशमुख, मच्छिंद्रनाथ भालेराव, सुलभा ढोले, योगेश जाधव, अझहर शेख रामेश्वर कांडूरे, घनशाम पाटील, दिलीप पाटील,भास्कर तायडे, महेश भोसले व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे.या पोलीस अधिकाऱ्यांची बदली अमरावती परिक्षेत्र अंतर्गत करण्यात आली आहे.बुलडाणा एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख आता अकोला बदलून जाणार आहे तर इतर जिल्ह्यातून अनेक अधिकारी बुलडाणा जिल्ह्यात नव्याने येणार आहे.