Home जळगाव प्रामाणिकपणा हे धीर सहनशीलता आणि उदार अंत:करण्याचे नाव —- प्रेषित सल्ल.

प्रामाणिकपणा हे धीर सहनशीलता आणि उदार अंत:करण्याचे नाव —- प्रेषित सल्ल.

303

रावेर (शरीफ शेख)
वहदत-ए-इस्लामी हिंद रावेर तर्फे प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांचा परिचय सप्ताह साजरा करण्यात आला.प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणी समस्त मानव समाजा पर्यंत पहुंचावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुसंधान रावेर येथील छोर्यां मार्केट बुरहानपुर रोड, आंबेडकर चौक ,बस स्टैंड, मार्केट यार्ड ,गांधी चौक, व शहरातील परिसरात मुस्लिमेंत्तर बाँधवासमोर प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल.यांचा परिचय करून देण्यात आला. त्यांच्या शिकवणित ते म्हणाले कि, कुणावर अत्याचार करू नका, अंधश्रद्धा राखणारा,टोमणा मारणारा, दोष देणारा आणि गलीच्छ बोलणारा आणि ओरबट बोलणारा ईमानधारक होऊ शकत नाही. अशा लहान लहान परंतु मौलिक शिकवणीची शिकवण सर्वानी जानू घ्यावी, त्यावर आचरण करावे जेणे करूंन एक सभ्य समाजाची निर्मिती हो सकती शकते. यावरुन आपणास अंदाज हाईल कि, पैगंबर हजरत मुहम्मद सल्ल.यानी नैतिकता आणि आचरण यांचे संबंध आणि नंतर नैतिकतून जीवनाचे सर्व विभागाचे संबंध कशा प्रकारे स्थापित केले आहे. त्यांनी केवल बोलण्या पुरते मर्यादित ठेवले नाहित तर त्यावर आचरणाचा मार्ग दाखविला. अशा अनेक महत्वपूर्ण बाबी संबंधित सखोल अशी माहिती वहदत ए इस्लामी हिंद तर्फे जाकिर हुसैन नसीर खान यानी मांडली. याप्रसंगी उपस्थितांना प्रेषित वचनांची “खरी महिमा “पुस्तक वितरित करण्यात आले.