Home रायगड बोर्लीपंचतन येथील डॉ. राजेश पाचारकर मित्रमंडळाच्या सेवाभावी कार्याचा खासदार सुनिल तटकरे यांच्या...

बोर्लीपंचतन येथील डॉ. राजेश पाचारकर मित्रमंडळाच्या सेवाभावी कार्याचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सन्मान

58
0

उदय वि कळस

रायगड – विधान परीषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा,तळा,माणगाव, म्हसळा,श्रीवर्धन या पाच तालुक्यांतील सेवाभावी कार्यात आपले योगदान देऊन संकट काळात गोरगरीबांना मदत करणाऱ्या संस्था , मंडळ यांच्या कार्याची दखल घेत व अनेकांना भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासंदर्भात ऊर्जा व प्रेरणा देण्यासाठी पावलावर पाऊल या संकल्पनेअंतर्गत  सेवाभावी व सामाजिक जाणिवेतुन आरोग्य,शैक्षणिक व सामाजिक अशा विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२  मंडळांना त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून कोलाड येथील ॐ नमः शिवाय मंगल कार्यालयात सामाजिक बांधिलकीचे भान जपत व शारीरिक अंतराचे कसोशीने पालन करुन मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा.खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यातआले.

यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बेस्ट मंडळ अशा पाच मंडळांचीसुध्दा निवड करण्यात आली यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील डॉ.राजेश पाचारकर हे आपल्या नोकरी निमित्ताने आपले गाव सोडून मुंबईत आले मात्र आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी आरोग्य,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वखर्चाने गेली चार वर्षे सातत्याने गोर गरीबांसाठी कार्यरत असलेल्या डॉ.राजेश पाचारकर आपल्या मित्र मंडळाच्या सहाय्याने बोर्लीपंचतन पंचक्रो शीमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवुन आरोग्य,शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्याचबरोबर कोरोना महामारी आणि निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गोरगरीबांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या उपक्रमातून कार्यरत राहुन करीत असलेली मदतकार्य याची दखल घेऊन मा.खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

     पुरस्कार्थींचा गौरव करताना मा. खासदार सुनिल तटकरे म्हणाले की अशा प्रकारच्या पुरस्कार सोहळ्यातून पुरस्कार्थींच्या कार्याची ओळख समाजाला होऊन त्यातून उत्तम कार्य करण्याची प्रेरणा इतरांनासुध्दा मिळते किंबहुना अशाच प्रकारचा उद्देश पुरस्कार सोहळ्याचा असतो.हे पुरस्कार्थी समाजातील तळगाळापर्यंतच्या लोकांमध्ये काम करणारे आहेत.अशा प्रकारच्या कार्यक्रमाची संकल्पना राबवुन त्यातुन योग्य अशा मंडळांची पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक रुपेश बामुगडे व महेश बामुगडे यांचे त्यांनी विषेश आभार मानले.
गेले सात आठ महीने कोरोना महामारी,निसर्ग चक्रीवादळ अशा अनेक संकटात सापडलेल्या गोर-गरीब,गरजु लोकांना आपल्या सेवाभावी कार्यातुन बहुमुल्य अशी मदत करुन सामाजिक दायीत्व जपणाऱ्या मंडळांच्या प्रेरणादायी कार्याची दखल पावलावर पाऊल या संकल्पनेतुन घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केल्याने भविष्यात अनेकांना यातुन जास्तीत जास्त सेवाभावी कार्य करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

अनिकेत तटकरे ( विधान परीषद आमदार ) 

 – गरजु व गोर गरीबांसाठी करीत असलेल्या सेवाभावी कार्याची दखल आमदार आनिकेतभाई तटकरे यांच्या  पावलावर पाऊल या कार्यक्रमाने घेऊन आम्हाला अधिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. माझ्यासह अनेकांना भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासंदर्भात ऊर्जा व प्रेरणा देणारा असा हा सन्मान आहे.या सन्मानामुळे मिळणारे आदराचे स्थान ही आमच्या कामाला आपल्या माध्यमातून समाजाने दिलेली पोचपावती आहे.यापुढेही समाजसेवेचा घेतलेला हा वसा सदैव राहण्यासाठी मी व माझे सहकारी वचनबद्ध आहोत.