
मजहर शेख
नांदेड / माहूर , दि. २७ – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र माहुर येथे आदिशक्ती रेणुका मातेची महापूजा व महाआरती चे आयोजन आज दिनांक 27 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता पाच ब्रह्मवृंद यांच्या मार्फत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महापूजा व महाआरतीस काँग्रेस कार्यकर्ते व अशोक राव चव्हाण यांचे समर्थकानी उपस्थित राहणाऱ्या मंडळींनी सॅनीटायझर व मास्क सह कोरूना सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माहूर शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी आवाहन केले आहे.











































