Home रायगड श्रीवर्धन तालुका श्रमीक पत्रकार संघाची स्थापना ,  अ़ध्यक्ष स्थानि उदय वि. कळस...

श्रीवर्धन तालुका श्रमीक पत्रकार संघाची स्थापना ,  अ़ध्यक्ष स्थानि उदय वि. कळस तर उपाध्यक्ष श्रीकांत शेलार

192

बोर्लीपंचतन येथे विजयादशमीच्या मुहुर्तावर श्रीवर्धन तालुका श्रमीक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली.

रायगड – संघांच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार उदय वि कळस तर उपाध्यक्षपदी श्रीकांत शेलार सचिव सर्फराज दर्जी खजिनदार रविंद्र पेरवे यांची एकमताने निवड करण्यात आली असुन संघांचे सदस्य गणेश प्रभाळे,विजय कांबळे, मकरंद जाधव,अमोल चांदोरकर, मुझफ्फर अलवारे,कुणाल माळवदे केतन माळवदे या सर्वांच्या सहभागातुन श्रमीक पत्रकार संघ यापुढे तालुक्यामध्ये कार्यरत असणार आहे.

बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाणे येथे श्रीवर्धन उपविभागीय पोलीस आधिक्षक श्री.बापुराव पवार यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र शेलार यांना पत्रकार संघाची स्यापना व पुढील कामकाजाबाबत निवेदन देउन विवीध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पत्रकार हा सामान्य नागरिकांपेक्षा कधीही वेगळा नसतोच. जनसामान्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम पत्रकार करीत असतो.
कोणत्याही प्रकरणातील सत्य काय आहे,याचा शोध घेत,बातमीचा पाठपुरावा करत,ते सत्य लोकांसमोर निर्भिडपणे व निपक्षपणे सादर करणे हीच पत्रकारितेची खरी व्याख्या आहे.

पत्रकारांना सर्वच बातम्या द्याव्या लागतात.त्यामुळे काही वेळा लोकप्रतिनीधी,स्थानिक राजकीय पुढारी,नोकरदार,व्यावसायिकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. वार्तांकन हा आपल्या कामाचा भाग असून त्यात आपण वैयक्तिक कोणाची बाजू न घेता काम करण्याचा प्रयत्न त्याचबरोबर आपण सर्वांचे मित्र आहोत कोणाचेच शत्रू नाही पत्रकारांच्या लेखणीतूनच जनतेसमोर समाजातील प्रश्न व समस्या येत असतात.तळागाळातील ग्रामीण जनतेला न्याय देण्याचे काम व शेवटच्या घटकापर्यतच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पत्रकार तत्पर असतो.ग्राम विकासात पत्रकाराची भुमिका महत्त्वाची आहे.
त्याचा आधारे ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे अशीच श्रमीक पत्रकार संघाची कार्यपद्धती असेल असे प्रतिपादन अध्यक्ष उदय कळस व उपाध्यक्ष श्रीकांत शेलार यांनी केले.