Home बुलडाणा वाह रे निर्दयी माता लहान बालकास उघड्यावर दिले फेकून ,

वाह रे निर्दयी माता लहान बालकास उघड्यावर दिले फेकून ,

278
0

 

धक्कादायक घटना ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

आज सकाळी एक धक्कादायक घटना डोंगर खंडाळा येथे घडली असून एका मातेने आपल्या नवजात बालकास गावातील धरणाच्या काठी फेकून देण्याची धक्कादायक घटना घडली असून या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील एका महिलेने आपल्या नवजात बालकास गावातील धरणा जवळ आणून फेकले ही बाब गावकऱ्यांना कळताच या बालकास बघण्यासाठी गावकऱ्यांनी धरणा काठी धाव घेतली, तो पर्यंत त्या नवजात बालकास कुत्र्यांनी तोडण्याच्या प्रयत्न केला यात या नवजात बालकाचा हात जखमी झाला परंतु एका महिलेने त्या बालकास पोलीस येईपर्यंत स्वतःजवळ घेतले पोलीस आल्यानंतर बाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले मिळालेल्या माहिती नुसार या प्रकरणी गावातीलच एक महिलेस ताब्यात घेण्यात आले त्या महिलेने असे कृत्य का केले याचा तपास सुरू असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहे