Home बुलडाणा दोन तरुण मुलीसह आईची निर्घृण हत्या ,

दोन तरुण मुलीसह आईची निर्घृण हत्या ,

802

 

एक आरोपी अटक ,

उडाली खळबळ ,

अमीन शाह

बुलडाणा ,

मोताळा तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रूक ( लांडे ) शिवारात महिलेचा खून करण्यात आल्याचे रात्री समोर आले होते . आज दुपारी 15 ऑक्टोबरला सकाळी या महिलेच्या दोन्ही मुलींचाही खून करून विहिरीत फेकल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून , त्याच्याकडून मुलींबाबत माहिती समोर आली आहे . या मुलींपैकी एक अनैतिक संबंधातून पाच महिन्यांची गर्भवती होती . खुनाचे कारण अद्याप वृत्त लिहेपर्यंत समोर आले नव्हते . पोलीस ताब्यात घेतलेल्याकडून माहिती घेत आहेत . जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या घटनेची अधिक माहिती आज पत्रकारांना दिली . पिंपळखुटा बुद्रूक येथील शंकर त्र्यंबक मालठाणे हे पत्नी सुमनबाई ( 55 ) , विधवा मुलगी राधा ( 28 ) , घटस्फोटित मुलगी शारदासह ( 25 ) राहतात . त्यांच्या एका मुलीच्या अनैतिक संबंधाबाबत गावात चर्चा होती . या संबंधातून ती 5 महिन्यांची गर्भवती राहिल्याचीही कुजबूज होती . 14 ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास सुमनबाई व दोन्ही मुली राधा व शारदा घरातून गायब झाल्या होत्या . काल संध्याकाळी सुमनबाईचा मृतदेह शिवारातील रामेश्वर मालठाणे यांच्या शेतातील हौदात पाण्यात रक्तबंबाळ अवस्थेत सापडला होता
.त्यांच्या दोन्ही मुली राधा व शारदा बेपत्ता होत्या . अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची तक्रार पोलीस पाटील शेषराव उमाळे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्याला दिली होती . त्यावरून पोलिसांनी अज्ञात खुन्याविरुद्ध गुन्हा नोंद करून बोराखेडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली व संशयावरून या प्रकरणी दादाराव महेसागर यास अटक करून त्यास पोलिसी हिसका दाखवून विचारपूस केली असता . त्याने दोन्ही मुली गावाजवळीलच एका विहिरीत ( महिलेचा मृतदेह आढळला त्याच्या अगदी जवळच ) असल्याचे सांगितले . त्या वरून पोलिसांनी दोघ्या बहिणीचे मृतदेह बाहेर काढून प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविले या तिहेरी हत्याकांडामुळे अवघा जिल्हा हादरला आहे . पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे ,