Home मराठवाडा किरण खरात यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

किरण खरात यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

981
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

आज दिनांक १५ ऑक्टोबर गुरूवार रोजी, सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पाथरवाला बुद्रुक येथील रहिवाशी किरण प्रभाकर खरात यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. निधनाची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.सदरील दुःखद घटनेची वार्ता परिसरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .किरण दादा मागील काही महिन्यांपासून आजाराशी मोठ्या धैर्याने झुंज देत होते , मात्र नियतीला बहुदा हे सर्व मान्य होते, आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आजी, आई, वडील ,पत्नी ,दोन मुले, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. सर्वांचे लाडके किरण (दादा) राहिले नाहीत. त्यांच्या अकाली निधनाने मनाला सुन्न करणारा धक्का बसला आहे.