Home बुलडाणा डॉ , पायल तडवी आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

डॉ , पायल तडवी आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

180
0

.

 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यावर कार्यवाही करा ,

मलकापूर प्रतिनिधी ,

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कोर्टात त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करून रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या अधिष्ठाता आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या वर कारवाई करावी याबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलडाणा जिल्हा नेते अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत देण्यात आले
सुप्रीम कोर्टाने दि. 8/10/2020 रोजी डॉ. पायल तडवी आत्महत्या केसमधिल आरोपींना नायर मेडिकल कॉलेज मधे पुढील शिक्षणासाठी अनुमती देणारा निकाल दिला वैद्यकीय शिक्षणानंतर डॉक्टर पायल तडवी आदिवासी भिल तडवी समाजातील पहिली महिला डॉक्टर होणार होती. पण नायर हॉस्पिटल मधील आरोपी डॉक्टर्सनी वारंवार मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.डॉक्टर पायल तडवी च्या आत्महत्या संदर्भात संबंधित आरोपी महिला डॉक्टर्सना दोषी मानून खटल्यातील साक्षीदार व पुराव्यात छेडछाडीची शक्यता लक्षात घेऊन हायकोर्टाने नायर मेडिकल कॉलेज मधे पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्रतिबंध करणारा निकाल दिला होता पण आरोपी डॉक्टर या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेल्या सर्वोच्च न्यायालयाने डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात जो निकाल दिला आहे तो पहाता पायलला न्याय मिळवून देण्याच्या कामी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे
उच्च शिक्षण घेणाऱ्या दलित-आदिवासी, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तींना कोणत्याही सवलती न देता कठोर आणि न्याय निष्ठ भूमिका घेऊन डॉक्टर पायल तडवी ला मृत्यूनंतर न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी या रास्त भूमिकेसाठी वंचित बहुजन आघाडीने उपरोक्त मागणी केलेली आहे.
सदर निवेदनावर जी.उपाध्यक्ष भाऊराव उमाळे,ता.उपाध्यक्ष गजानन झनके, विलासभाऊ तायडे,जगणभाई गवई,रविंद्र मोरे,विनोद वानखेडे,विष्णू इंगळे, पी.डी.पवार,श्रीरंग तायडे, व्ही.सी.मोरे,श्रावण झनके,सतीश नरवाडे,रविराज खराटे,रमेश तायडे,इलियास खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत