
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रम माजी नगराध्यक्ष व संघाच्या बांधकाम समितीचे उपाध्यक्ष श्री रमणलाल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.
1000 चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येणार असलेल्या ह्या सभागृहात बैठक व्यवस्था, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लायब्ररी,व इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणाऱ असून त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने मदतीचे आवाहन केले आहे. संघाच्या वतीने आगामी काळात कार्यालय परिसरात कंपाऊंड वॉल,स्वागत गेट,तसेच अद्ययावत कार्यालय उभारणी केली जाणार असल्याची माहिती यावेळी संघाचे उपाध्यक्ष श्री एम डब्ल्यू पाटील यांनी दिली.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत सचिव श्री प्रमोद डोंगरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.याप्रसंगी शेतकी संघ अध्यक्ष श्री एल एन पाटील,बांधकाम समिती सदस्य, दिलीप माधवराव पाटील,प्रभाकर बैरागी, ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, आर्किटेक्ट नितीनभाई गुजराथी ,राजेंद्र भाई गुजराती, शिरिषभाई गुजराती,आदि उपस्थित होते.
वृत्त क्र.2 ज्येष्ठ नागरिक संघाची ऑनलाईन बैठक उत्साहात संपन्न.
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गत कोरोना पर्वात प्रथमतः ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली .अध्यक्ष श्री व्ही.एच .करोडपती यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तर सचिव प्रमोद डोंगरे यांनी प्रास्ताविकातून बैठकीची संकल्पना मांडली.व काळासोबत ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा तंत्रज्ञान व आधुनिकतेचा अवलंब करीत या बैठकीचा उद्देश विषद केला. बैठकीत कोरोना काळातील अनुभवांची चर्चा व आगामी काळात घ्यावयाची काळजी यावर उपस्थितांनी आपले दिलखुलास मनोगत व्यक्त केले.
बैठकीत फेसकोमचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री.डी. टी .चौधरी, अ. भा.जॉईंट सेक्रेटरी जगदीश जाझरिया, ऐनपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री पंडितराव पाटील सर ,यावलचे श्री बाळकृष्ण वाणी ,प्रा.श्यामभाई गुजराथी, जयदेव देशमुख,आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.बैठकीत सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.कोरोना काळात नियम पालन करीत आपण जगल पाहिजे,तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहार पार पाडले तर कोणत्याही परिस्थितीत आपण सर्व समस्येवर मात करूशकतो,असे मनोगत उपस्थित सर्वच वक्त्यांनी व्यक्त केले.











































