Home बुलडाणा रेती माफियांचा मंडळ अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला;मंडळ अधिकारी गंभीर जखमी! गुन्हा दाखल!

रेती माफियांचा मंडळ अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला;मंडळ अधिकारी गंभीर जखमी! गुन्हा दाखल!

486

अंढेरा/प्रतिनिधी(शेख हनिफ)

देऊळगाव राजा तालुक्यात संत चोखा सागर जलाशय असुन त्याखाली खडकपुर्णा नदी वाहते.खडकपुर्णा नदी रेती घाटासाठी जिल्हाभर प्रसिद्ध असुन तालुक्यात मोठ्या संख्येने रेती घाट आहेत.बांधकामासाठी याच रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.सध्या पाच हजार रुपये ब्रासने एका टिप्परची किंमत वीस हजार रुपये सुरु आहे.या नदीवरुन निमगाव गुरु,नारायणखेड,डिग्रस बु!,हे रेतीघाट असुन या रेतीघाटाचां लिलाव झाला नसुन रेति चोरीला आळा घालण्यासाठी तहसिलदार देऊळगाव राजा यांनी आपल्या अखत्यारीत नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी,तलाठी,कोतवाल यांची पथके स्थापन करुन दिवस व राञ अशी दोन प्रकारात महसुलच्या कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करुन रेती चोरीला आळा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न तहसिलदार यांच्याकडुन करण्यात आला.परंतु अवैध रेती माफियांचा अवैध रेती उपसा सुरीच असुन ६आँक्टोबर २०२०रोजी सकाळी चार वाजता देऊळगाव महीचे मंडळ अधिकारी व दोन कोतवाल भगवान ढोले व संतोष घुगे यांचे पथक राञभर गस्तीवर असतानां नारायणखेड फाट्यावर असतानां सकाळी चार वाजता अवैध रेतीने भरलेले टिप्पर दिसून आले सदर टिप्परला हात
दिला असता चालकाने त्याचे टिप्पर थांबविले.त्यास वाहतुक परवाना विचारला असता नसल्याचे सांगितले.त्यामुळे मी वाहन टिप्पर हे जप्त करण्यात आले.व चालकांस जप्ती
पंचनाम्यावर सही करण्यास सांगितले आसता चालाकाने नकार दिला. त्यास नाव विचारले असता त्याने स्वताचे नाव संजय गवई रा.चिखला वय 24 असे सांगीतले आणि टिप्पर मालकाचे नाव
भरत संजय प-हाड रा.डिग्रारस बु! वय 30असे सांगितले. टिप्पर मधे एकुण चार ब्रास अवैध रेती आढळुन आली.टिप्पर चा रंग समारील भाग पांढरा व मागील भाग तपकीरी रंगाचा होता
टिप्परवर नंबर नव्हाता टिप्पर विना नंबर होते जप्त केलेलें टिप्पर पोस्टे अंढेरा येथे चालकास घेण्यास सांगीतले त्याने टिप्पर घेण्यास नकार दिला त्यानंतर टिप्पर
चालकाकडुन चाबी घेण्यात आली असाता.पाठीमागुन एक स्कार्पिओ गाडी आली त्यातुन आठ ते दहा जण होते.त्यातील चौघानी हातातील काठ्यांनी माझ्यावर हमला करता मारहाण करण्यास सुरुवात केली.यामध्ये माझे डोक्याला व डाव्या हाताला व उजवे हाताला दुखापत झालेली आहे.त्यांनी माझे वर हमला करून मला जखमी केले.मी आरडाओरडा केली असता माझे सोबत माझे सहकारी भगवान ढोले व संतोष घुगे कोतवाल हजर होते.ते माझ्या मदतीला धाऊन आले असता.स्कार्पिओ गाडी मधे बसून होते.त्यांनी रेतीने अवैध भरलेले टिप्पर घेवून पळुन गेले.त्यानंतर ते देउळगामही कड़े पळून गेले व त्यांनी शासकीय कामात अडथळा करून मारहाण केली व रेती किमंती 20000 रू चोरून नेली आहे.व
आपत्ती व्यवस्थापन कायदयाचे उल्घंन केले आहे.

—————————————————
[रेती माफियांकडुन मंडळ अधिकारी रविंद्र काकडे यांच्यावर जिवघेणे हल्ले सुरुच?
देऊळगाव महीचे मंडळ अधिकारी रविंद्र काकडे हे अवैध रेती माफियांविरोधात वारंवार कार्यावाही करत असुन त्यांच्या वर आतापर्यंत अनेकवेळा प्राणघातक हल्ले झाले असुन आवैध रेती माफिया हे रविंद्र काकडे यांना टार्गेट करत असुन त्यांनी मोठ्या प्रमाणात रेती माफियांविरोधात सतत कार्यवाही केली असाल्याने रेती माफिया हे रविंद्र काकडे यांना टार्गेट करत असुन काठ्यानी मारहाण करणे,टिप्परने कट मारणे,टिप्पर अंगावर घालणे,रेती माफियांच्या महिलाकडुन खोटे विनयभंगासारखे गुन्हे दाखल करणे अशा मागील सहा महिन्यात अनेक घटना घडल्या असुन देऊळगाव राजा तहसिलदार सारिका भगत यांनी महसुलाच्या कर्मचाऱ्यांवरील हल्ले लक्षात कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे असतानां तसे होताना दिसत नाही.याला कारणीभुत कौण तरी सदर प्रकरणावर नव्याने आलेले जिल्हाधिकारी एस्.राममुर्ती व जिह्याचे पालकमंञी यांनीच लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा महसुलच्या कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणास मुकावे लागेल!