Home विदर्भ धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेचे धामणगाव तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेचे धामणगाव तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

71
0

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या:-उमेश घुरडे यांची संघटनेच्यावतीने मागणी…..

प्रशांत नाईक

 

महाराष्ट्रातील धनगर जमातीस तात्काळ अनुसूचित जमाती (S.T)आरक्षणाची अंमलबजावणी करणे ,धनगर जमातीस विविध योजनांचा लाभ सुरू करणे ,धनगर मेंढपाडावर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळण्याकरिता कठोर कायदे करणे. आदी मागण्यांचे निवेदन धामणगाव रेल्वे तालुका धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने तहसीलदार धामणगाव यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याबाबत तरतूद केली असून शासनाकडून सदर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप धनगर समाजातील लोकांनी केला आहे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. काही राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती चे आरक्षण लागू करण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील अनुसूचित जमाती मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सरकारने धनगर समाजाच्या उद्धारासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली परंतु ती रक्कम संबंधित खात्यात वितरित न झाल्यामुळे धनगर जमातीतील लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. ही रक्कम संबंधित खात्यात त्वरित देण्यात यावी अशी एकमुखी मागणी धनगर महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने करण्यात आली.
हे निवेदन उमेश भाऊ घुरडे( महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी मल्हार सेना) यांच्या नेतृत्वात भाऊरावजी गाढवे, मंगेश बुंदाळे प्रमोद भाऊ ढोमणे, रमेश धनवणे ,ओंकार उंदरे, गोविंदा आगरकर, प्रकाश गाढवे सुरेश सरोदे, श्रीनिवास लवकर ,दिलीप डोके ,अशोक महात्मे ,प्रकाश गंधे, वैकुंठ वैद्य, गजानन उपाशे ,निलेश धावणे, श्याम गंधे, विनोद मुंदाने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.