Home बुलडाणा पतीने पत्नीस मारून प्रेत शेतात गाडून टाकले ,

पतीने पत्नीस मारून प्रेत शेतात गाडून टाकले ,

583
0

 

निर्दयी पती ची करतूत

अमीन शाह ,

बुलडाणा ,

दारुड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे आज उघडकीस आली . पतीने पत्नीस धारधार शस्त्राने हत्या करून प्रेत शेतात पुरवले होते . जाईबाई समाधान तायडे ( वय ५० ) रा . जिगाव असे मृतक महिलेचे नाव आहे . जिगाव येथील समाधान तायडे हा त्याची पत्नी जाईबाई हीस नेहमी दारुसाठी पैसे मागायचा . त्यातून त्यांचे नेहमीच वाद व्हायचे . यातून त्याने काल पत्नीची हत्या करून शेतात प्रेत पुरले . मात्र आज सकाळी शेतात जात असताना काही लोकांना दुर्गंधी येवू लागली . तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला . घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी पोहचून पंचनामा केला . तेव्हा मृतक महिलेची ओळख पटली . पोलिसांनी पतीस अटक केली असून पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ मनोहर बोरसे , अरुण खुटाफळे तपास करीत आहे .