
नात्याला काळिमा फासणारी घटना ,
अमीन शाह ,
गोंडपिपरीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात पीडितेच्या आजोबांचे काल निधन झाले . दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी जेवण करण्यास बसले . त्यामुळे कुणाचेही लक्ष नसल्याचे संधी साधून मद्यधुंद चुलत्याने आपल्याच अल्पवयीन पुतणीवर घराच्याबाहेर अत्याचार केला . मुलीचे वडील घराबाहेर निघाले असताना त्यांना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला . ते आवाजाच्या दिशेने गेले असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला . मुलीची वडिलांनी तिची विचारपूस केली असता काकाने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तिने घरच्यांना दिली . यापूर्वी देखील आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता . याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती . मुलीच्या आईवडिलांनी काल रात्री अकरा वाजता गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गावात जाऊन आरोपीला अटक केले.दरम्यान , या घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट दिली . त्यांना गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे , पोलीस हवालदार अनिल चव्हाण , प्रेम चव्हाण यांनी प्रकरणाची माहिती दिली .










































