Home बुलडाणा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्याची स्वाभिमानीची मागणी…!

शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्याची स्वाभिमानीची मागणी…!

94
0

शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करा..!

अनिल वाकोडे

चिखली : दि १ ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे यांनी तहसिलदार चिखली यांना एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी केली आहे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब व संघटनेची मुलुख मैदानी तोफ प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात राज्य भर शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी अहोरात्र लढा सुरू असून बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते सदैव शेतकऱ्यांच्या छोट्या मोठया प्रश्नासाठी रस्तावर असतात,तसेच चिखली तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात पीक काढणीच्या अवस्थेत असतांना अतिवृष्टीमुळे मूग,उडीद,सोयाबीन,कपाशी,मका,ज्वारी यांच्यासह भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले असून तशी प्रत्क्षय पाहणी महसूल व कृषी विभागाने केलेली सुद्धा आहे त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव खूप मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत,अश्यावेळी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचे त्यांच्या हक्काचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करा अश्या स्वरूपाचे निवेदन शेतकरी नेते अनिल वाकोडे यांची तहसिल दार चिखली यांना दिले यावेळी निवेदनावर नितीन राजपूत,रामेश्वर परिहार,भारत खंडागळे ,काशीनाथ बकाल,शरद मोलवंडे,अमोल सोळंकी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.