Home बुलडाणा विवाहीतेची विहिरीत उडी घेऊण आत्महत्या. गुन्हा दाखल ,

विवाहीतेची विहिरीत उडी घेऊण आत्महत्या. गुन्हा दाखल ,

429

 

गुन्हा दाखल ,

हनिफ शेख ,

देऊळगाव घुबे ता.चिखली:-येथील24 वर्षीय विवाहितेने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळीअंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव घुबे येथे घडली.
येथील 24 वर्षीय ज्योती गणेश घुबे ही महिला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर गेली होती मात्र सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तपास लागला नाही मात्र गावातील काही व्यक्तींनी ती महिला शेतात गेली असल्याचे सांगितले होते त्यामुळे शेतात शोध घेत असताना विहिरी जवळ चप्पला दिसून आल्या त्यामुळे विहिरीमध्ये शोधण्यासाठी गळ टाकला असता विहिरीत महिला मृत अवस्थेत आढळून आली अशी माहिती पोलीस पाटील हारीभाऊ जाधव यांनी पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी 306,26नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास अंढेरा ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे स्वतः हा करीत आहे.