Home परभणी ढोल बजाओ आंदोलनास पाठिंब्यासाठी गंगाखेडात धनगर समाजाचे निवेदन

ढोल बजाओ आंदोलनास पाठिंब्यासाठी गंगाखेडात धनगर समाजाचे निवेदन

56
0

परभणी / गंगाखेड -लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुकारलेल्या ढोल बजाव सरकार जगाओ या महाराष्ट्रात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत, मंदिर ,तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आदि ठिकाणी ढोल बजाव आंदोलनची हाक दिली होती. या हाकेला विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारी च्या काळात शासकीय नियमांचे पालन करत गंगाखेड तालुक्यातील समाज बांधव च्या वतीने तहसीलदारांना आंदोलनास पाठिंबा व एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पदेगावकर , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, धनगर आरक्षण कृती समितीचे तालुकाध्यक्ष नारायणराव धनवटे, राजे मल्हार मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष मुंजाभाऊ लांडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष राम भंडारे आदींची उपस्थिती होती. धनगर समाजाचे नेते आनंद बनसोडे यांनी दुपारी गंगाखेड येथे निवेदन करत्याची भेट आगामी आंदोलना संदर्भात चर्चा केली.